नवी दिल्ली : ऑईल इंडिया लिमिटेडने विविध पदांची भरती जारी केली आहे. ही भरती आसामच्या दुलियाजन येथील मुख्यालयासाठी काढण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ऑपरेटर- I (HMV), श्रेणी -7 मधील 36 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. जर या पदासांसाठी नोकरी करण्यास आपण इच्छुक असाल तर अधिकृत वेबसाइट oilindia.com ला भेट देऊन अर्ज करू शकता.
पदांची संख्या आणि पात्रता
वयाची मर्यादाया पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. ओबीसीसाठी कमाल वय 33 आणि अनुसूचित जाती / जमातीसाठी 35 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
कधीपर्यंत अर्ज करावा?या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2020 निश्चित करण्यात आली आहे.
नियुक्तीची प्रक्रियाया भरतीसाठी उमेदवारांची नियुक्ती लेखी परीक्षा व अवजड वाहन ड्रायव्हिंग टेस्टच्या आधारे केली जाणार आहे.
वेतनाबाबत माहिती
अर्ज करण्याची प्रक्रियाइच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑईल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 18 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.
कोरोना संकट काळात नोकरीच्या संधी दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
आणखी बातम्या...
- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका
- जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, महबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर निशाणा
- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"
- मोदी सरकार IRCTC मधील हिस्सा विकण्याच्या तयारीत, दोन दिवसांत शेअर ७ टक्क्यांनी घसरला