शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

शाब्बास पोरी! पानवाल्याच्या लेकीची नेत्रदिपक भरारी; केली कौतुकास्पद कामगिरी, झाली अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 3:17 PM

एका पान विक्रेत्याच्या मुलीने UPPCS 2022 मध्ये 21 वा क्रमांक मिळवून तिचे स्वप्न साकार केले आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. अनेक जण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडा येथील एका पान विक्रेत्याच्या मुलीने UPPCS 2022 मध्ये 21 वा क्रमांक मिळवून तिचे स्वप्न साकार केले आहे. ज्योती चौरसिया SDM बनली आहे. ज्योतीला हे यश तिच्या 6व्या प्रयत्नात मिळाले. 

गोंडाचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी डॉ. रोशन जेकब यांच्याकडून तिला खूप प्रेरणा मिळाल्याचे ज्योती सांगते. ज्योती लखनौहून गोंडा येथील तिच्या घरी आली तेव्हा ढोल-ताशांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. नातेवाईक असो किंवा शेजारी, सर्वांनी ज्योतीचे पुष्पहार आणि आरती करून स्वागत केले. ज्योतीचे वडील हेमचंद चौरसिया सांगतात की, आज मी खूप आनंदी आहे. जे अपेक्षित होते तेच मुलीने केले आहे. 

ज्योतीने करून दाखवलं

ज्योतीचे वडील हेमचंद चौरसिया हे मूळचे देवरिया जिल्ह्यातील असून ते नोकरीच्या शोधात 1997 मध्ये गोंडा येथे आले आणि येथेच स्थायिक झाले. हेमचंद चौरसिया यांनी पानटपरीतून कमाई करून मुलांना चांगले शिक्षण दिले. ज्योतीला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. ज्योतीचा मोठा भाऊ संदीप हाही अभ्यासात चांगला होता, पण त्याला यश मिळाले नाही. असे असतानाही वडिलांनी मुलीच्या तयारीत कोणतीही कसर सोडली नाही आणि शेवटी ज्योतीने करून दाखवलं.

हिंमत हारली नाही

ज्योतीने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण गोंडा येथे केले आणि लखनौमध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. ज्योतीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने 2015 पासून UPPCS परीक्षा द्यायला सुरुवात केली तेव्हा तिला पेपरही पूर्ण करता आला नाही. पण तिने धीर सोडला नाही आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. यावेळी, 6व्या प्रयत्नात ज्योतीने प्रथमच परीक्षा क्लिअर केले, मेन क्लिअर केले आणि मुलाखत उत्तीर्ण होऊन ती SDM झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी