शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

मोदी सरकारचं चॅलेंज अन् २ लाख रुपये जिंकण्याची संधी; ३१ जानेवारीपर्यंत करता येईल अर्ज! जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 5:52 PM

Prajjwala Challenge Scheme : तुम्हाला सरकारकडून २ लाख रुपये जिंकण्याची संधी हवी असेल तर मोदी सरकारनं घोषीत केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होऊन तुम्ही सहज विजेते होऊ शकला.

Prajjwala Challenge Scheme : तुम्हाला सरकारकडून २ लाख रुपये जिंकण्याची संधी हवी असेल तर मोदी सरकारनं घोषीत केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होऊन तुम्ही सहज विजेते होऊ शकाल. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्यासाठी आयडिया आणि उपाय देणाऱ्यांना सरकार २ लाख रुपयांचे बक्षीस देत आहे. ग्रामीण विकास मंत्रालयानं तरुण आणि हुशार युवा पिढीला प्रज्ज्वला चॅलेंजच्या माध्यमातून कल्पक सूचना किंवा उपाय सुचवण्यास सांगितलं आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही ३१ जानेवारीपूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता.

दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणाऱ्या कल्पना, उपाय आणि कृती सुचवण्याच्या उद्देशाने प्रज्ज्वला चॅलेंज योजना सुरू केली आहे. हे असे एक व्यासपीठ आहे जिथे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती, सामाजिक उपक्रम, स्टार्टअप्स, खाजगी क्षेत्र, नागरी समाज, समुदाय आधारित संस्था, शैक्षणिक संस्था आणि गुंतवणूकदार यांच्याकडून कल्पना मागवण्यात आल्या आहेत.

ग्रामीण विकास मंत्रालय नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपाय, सर्वसमावेशक वाढ, महिला उद्योजकतेत वाढ, किफायतशीर उपाय, रोजगार आणि स्थानिक मॉडेल इत्यादींबाबत कल्पना आणि उपाय शोधत आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ डिसेंबर २०२२ पासून सुरू झाली असून ती ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

विजेत्यांना मिळणार २ लाखांचं बक्षीसअर्जदारांच्या सुचवलेले उपाय आणि आयडिया शॉर्टलिस्ट केल्या जातील आणि शॉर्टलिस्ट केलेल्या कल्पनांना तज्ञ पॅनेलकडून रिव्ह्यू केलं जाईल. यासोबतच अव्वल ५ कल्पनांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी अर्जदार www.prajjwalachallenge.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकतात. 

या गोष्टींची विशेष काळजी घ्या

  • प्रज्वाला चॅलेंजसाठी अर्जदारांसाठी वयोमर्यादा नाही.
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ निश्चित करण्यात आली आहे.
  • अर्जदार prajjwalachallenge.com या वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
  • ५ विजेत्या अर्जदारांना सरकार २-२ लाख रुपयांचे बक्षीस देईल.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी