शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

निवडणुकीमुळे चार राज्यांत आमदारांसाठी ‘अच्छे दिन’

By admin | Published: June 02, 2016 3:09 AM

राज्यसभेच्या ४ जागांसाठी वाढलेली चुरस पाहता, चार राज्यांमधील आमदारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. आमदारांना वळते करण्यासाठी मोठी बोली लावली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीराज्यसभेच्या ४ जागांसाठी वाढलेली चुरस पाहता, चार राज्यांमधील आमदारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. आमदारांना वळते करण्यासाठी मोठी बोली लावली जाण्याचे संकेत मिळाले आहेत. या निवडणुकीत विविध पक्ष आणि राजकीय वर्तुळात असलेले संबंध, तसेच आमदारांच्या संख्याबळावरून लावले जाणारे डावपेच कसोटीला उतरणार असे दिसते.नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हरियाणा, झारखंड, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये हे चित्र दिसत असून, निवडणुकीची रंगत वाढली आहे. भाजपाने हरियाणा, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये संख्याबळाच्या तुलनेत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा जुगार खेळला आहे. काँग्रेसनेही कर्नाटकमध्ये तिसरी जागा पटकाविण्यासाठी रिअल इस्टेट सम्राट के. सी. राममूर्ती यांना उमेदवारी देत कंबर कसली. हरियाणात तर काट्याची चुरस शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत. ९० सदस्यीय विधानसभेत ४७ आमदार असलेल्या भाजपाने केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री वीरेंद्र सिंग यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे मीडिया सम्राट सुभाषचंद्र यांनी ओमप्रकाश चौटाला यांच्या आयएनएलडीचे १९, बसपा आणि अकाली दलाच्या प्रत्येकी एक, तसेच ५ अपक्षांच्या समर्थनाच्या बळावर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. १७ आमदार असलेल्या काँग्रेसने उमेदवार उभा केला नसला, तरी ज्येष्ठ वकील आर. के. आनंद हे काँग्रेसशी निकटस्थ मानले जातात. स्वत: चौटाला यांनीही त्यांना समर्थनाचे आश्वासन दिले आहे.८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत भाजपाकडे ४५ आमदार असून, केवळ एक उमेदवार निवडून आणण्याची क्षमता असताना, या पक्षाने मुख्तार अब्बास नकवी आणि महेश पोद्दार यांना उभे केले आहे. हेमंत सोरेन यांचे बंधू वसंत सोरेन यांचा पराभव हाच भाजपाचा हेतू दिसून येतो. उत्तराखंडमधील एकमेव जागेवर भाजपाला विजयाची खात्री नसतानाही, या पक्षाने काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांवर डोळा ठेवत गीता ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदीप तामता यांची अडचण वाढली आहे. त्यामुळे ११ जून रोजी निकाल जाहीर होईपर्यंत उत्तराखंडच्या आमदारांना ‘चांगले’ दिवस येतील.