हरिष गुप्ता / नवी दिल्लीसरन्यायाधीश जे. एस. खेहार यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ज्या पद्धतीने काम करीत आहेत त्यामुळे न्यायपालिकेत निश्चितच अच्छे दिनची शक्यता दिसत आहे.येत्या काही आठवड्यांत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांतील बहुतांश रिक्त जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे. माजी सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि नरेंद्र मोदी यांचे एकमत होत नव्हते. त्यामुळे सर्वोच्च व उच्च न्यायालयांतील रिक्त जागांचा प्रश्न रुतून बसला होता. प्पण आता सर्वोच्च न्यायालयातील रिक्त आठ जागा प्राधान्याने भरल्या जाणार आहेत. न्या. खेहार यांनी मोदी यांना कॉलेजियम लवकरच नावे सरकारला पाठवणार आहे. न्यायाधीशांची निवड पारदर्शी पद्धतीने होईल व त्यासाठीची योग्य ती प्रक्रियाही पाळली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. न्यायाधीशांच्या निवडीसाठी स्वत: खेहार यांनी मेमोरंडम आॅफ प्रोसिजरचा निर्णय घ्यावा आणि त्यानुसार त्याचे तंतोतंत पालन करावे, असे सुचवले होते. सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम जी नावे सरकारने सुचवली आहेत, त्यावरही विचार करणार आहे. स्वेगवेगळ््या उच्च न्यायालयांत रिक्त असलेल्या १५२ जागाही लवकरच भरल्या जातील. कॉलेजियमने डिसेंबरपासून एकही शिफारस केलेली नाही, त्यामुळे न्या. ठाकूर निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील रिक्त जागा आठ झाल्या आहेत.
न्यायपालिकेला येणार ‘अच्छे दिन’
By admin | Published: January 28, 2017 12:54 AM