शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

सुशासन आणि लाभार्थ्यांनी दिला भाजपला विक्रमी विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 6:11 AM

राष्ट्रीय स्तरावर आप बनू शकतो मुख्य विरोधी पक्षासाठी काँग्रेसला पर्याय, हाती आलेला विजय काँग्रेसने आपसातील लढाईने दूर लोटला, १९८५ नंतर यूपीत एका पक्षाचे पुन्हा सरकार

- शरद गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढण्याची नवीन परिभाषा लिहिली तर आम आदमी पार्टीने सुशासनाला मुख्य निवडणूक मुद्दा बनविला. सर्वाधिक नुकसान काँग्रेसला झाले तर सर्वाधिक फायदा भाजप व आपचा झाला.

पाचही राज्यांतील निकाल ऐतिहासिक राहिले आहेत. १९८५ नंतर प्रथमच उत्तर प्रदेशात एखाद्या पक्षाचे सरकार पुन्हा निवडून आलेले आहे. १९९९ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर उत्तराखंडमध्येही प्रथमच एखाद्या पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर येत आहे. पंजाबमध्ये प्रथमच अकाली दल व काँग्रेसशिवाय अन्य एखाद्या पक्षाचे सरकार सत्तेत येत आहे. गोवा व मणिपूरमध्येही भाजप आपली सरकारे वाचविण्यात यशस्वी झाले आहे.

उत्तराखंडमध्ये ७० टक्के जागा जिंकल्या तरी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव होणे याचा अर्थ भाजपला मिळालेला विजय राज्य सरकारांच्या प्रदर्शनामुळे नव्हेतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला, असा काढला जात आहे. उत्तर प्रदेशात जाट, ब्राह्मण यांच्याबरोबरच कुर्मी, मौर्य, राजभर, चौहान यासारख्या जाती व बेरोजगार युवकांची नाराजी असतानाही भाजपने जोरदार यश मिळविले आहे. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या रॅलींमध्ये जसा उत्साह होता, तसा उत्साह सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या रॅलींमध्ये होता. केंद्र व राज्य सरकारांनी चालविलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांनी उत्तर प्रदेशात अशी काही ‘व्होट बँक’ उभी केली की, त्यावर ना जातीय समीकरणाचा परिणाम झाला ना धर्माशी संबंधित भावनात्मक मुद्द्यांचा.

अंतर्गत कलहाने नाव बुडालीपंजाब व उत्तराखंडच्या काँग्रेसमधील अंतर्गत कहलामुळे ही स्थिती झाली. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, माजी अध्यक्ष सुनील जाखड व मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यातील मतभेदांनी पंजाबमध्ये काँग्रेसची नाव बुडविली. तर उत्तराखंडमध्ये माजी अध्यक्ष प्रीतम सिंह व केंद्रीय प्रभारी देवेंद्र यादव यांच्या हस्तक्षेपामुळे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हरीश रावत एवढे नाराज झाले की, त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली होती. ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपानंतरही मतभेद दूर झाले नव्हते.

राष्ट्रीय राजकारणावर परिणाम राष्ट्रीय राजकारणात आम आदमी पार्टी हळूहळू काँग्रेसची जागा घेत आहे का, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. पंजाबमध्ये पक्षाला ४२ टक्के मते मिळाली तर उत्तराखंडमध्ये एकही जागा वाट्याला आली नसली तरी ३.३७ टक्के मते मिळाली आहेत. गोव्यात ७ टक्के मते घेऊन दोन जागा जिंकल्या आहेत.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२