शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

शोकमग्न वातावरणात लाडक्या भूमीपुत्रास निरोप

By admin | Published: February 27, 2016 11:33 PM

जळगाव- शेतीला बळकटी व शेतकर्‍यांना उभारी देण्यासाठी सूक्ष्मसिंचन, टिश्यू रोपांचे आयुध देणारे लाडके भूमीपुत्र भवरलाल जैन (मोठे भाऊ) यांना हजारोंच्या जनसमुदायाने साश्रूू नयनांनी निरोप दिला. जैन हिल्स परिसर शोकमग्न झाला होता. जैन यांच्या अंत्यदर्शनावेळी अनेक मान्यवरांना गहिवरून आले. असा भूमीपुत्र होणे नाही..., भवरलाल जैन अमर रहे, अशी भावना शेतकरी, उपस्थितांनी व्यक्त केली.

जळगाव- शेतीला बळकटी व शेतकर्‍यांना उभारी देण्यासाठी सूक्ष्मसिंचन, टिश्यू रोपांचे आयुध देणारे लाडके भूमीपुत्र भवरलाल जैन (मोठे भाऊ) यांना हजारोंच्या जनसमुदायाने साश्रूू नयनांनी निरोप दिला. जैन हिल्स परिसर शोकमग्न झाला होता. जैन यांच्या अंत्यदर्शनावेळी अनेक मान्यवरांना गहिवरून आले. असा भूमीपुत्र होणे नाही..., भवरलाल जैन अमर रहे, अशी भावना शेतकरी, उपस्थितांनी व्यक्त केली.
बैलगाडीवरून पार्थिवाची यात्रा
जैैन हिल्सवरील कांताई निवासस्थानामधून जैन धर्मानुसार मांगलिक व इतर विधी पार पाडल्यानंतर पार्थिव बैलगाडीवर ठेवण्यात आले. पुष्पहारांनी सजविलेली बैलगाडी जैन यांचे पुत्र अशोक, अनिल, अजित व अतुल यांनी ओढली. त्यांचे नातवंडही या वेळी उपस्थित होते. राष्ट्रध्वजामध्ये असलेल्या जैन यांच्या पार्थिवाच्या या यात्रेत जैन यांचे चाहते, जळगावकर, ठिकठिकाणचे मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.

२.२८ वाजता पार्थिव टिश्यूकल्चर प्रयोगशाळेनजीकच्या शेत वजा मैदानावर आले. या मैदानावर पार्थिवानजीक जैन कुटुंबीय एकत्र आले. १०८ पुरोहितांनी मंत्रोच्चार सुरू केले. हे मंत्रोच्चार आटोपले तोपर्यंत पार्थिव अंत्यसंस्कारासाठी उभारलेल्या चौथर्‍यापासून काही अंतरावर ठेवण्यात आले होते.
पाऊले वळली जैन हिल्सवर
अंत्यसंस्कार तीन वाजेपासून सुरू होणार असल्याने दुपारी २ वाजेपासूनच मोठ्या भाऊंचे चाहते, मान्यवर, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी जैन हिल्सवर दाखल होत होते. रखरखत्या उन्हातहीपाहता पाहता हजारो चाहते, नागरिक एकत्र झाले.

भव्य मंडप, वाहनतळ
अंत्यसंस्कार स्थळानजीक सुमारे २० हजार लोक बसू शकतील एवढा मंडप उभारण्यात आला होता. उपस्थितांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जैन हिल्सवर जुन्या राजा भोज सभागृहावर आणि जैन हिल्ससमोरील मुख्य रस्त्यानजीकच्या मैदानावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती.

अंत्यसंस्काराच्या वेळेस विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, खासदार ईश्वरलाल जैन, आमदार डॉ.सतीश पाटील, गुलाबराव पाटील, हरिभाऊ जावळे, प्रा.चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, संजय सावकारे, उन्मेष पाटील, सुरेश भोळे, स्मिता वाघ, खान्देश विकास आघाडीचे नेते रमेशदादा जैन, कांतीलाल जैन, दलुभाऊ जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे, राजेश जैन, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जि.प.सीईओ आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक डॉ.जालींदर सुपेकर, माजी आमदार आर.ओ.पाटील, महेंद्रसिंग पाटील, ॲड.रवींद्र पाटील, केळी महासंघाचे भागवत विश्वनाथ पाटील, जैन इरिगेशनचे अधिकारी मनोज लोढा, आर.सुब्रह्मण्यम, डॉ.जे.के.दोषी, डी.एम.जैन, डॉ.सुभाष चौधरी, आर.बी.जैन, शशीकांत जैन आदींनी जैन यांचे अंत्यदर्शन घेतले.