नवी दिल्ली - इंडियन ऑईल कार्पोरेशनने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 100.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 1 जुलैपासून दिल्लीतगॅस सिलेंडरचे हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे विना अनुदानित गॅस सिलेंडरसाठी 737.50 रुपयांऐवजी 637 रुपयेच द्यावे लागणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मजबुत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एलपीजी 14.2 किलो किंमतीच्या घरगुती गॅस सिलेंडरमध्येच ही दरवाढ करण्यात आली आहे. अनुदानित सिलेंडरची खरेदी करताना बाजारमुल्याप्रमाणे पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र, सिलेंडरचे अनुदान बँकेत जमा झाल्यास प्रत्येक सिलेंडरसाठी 142.65 रुपये अनुदान मिळेल. त्यामुळे 1 जुलैपासून अनुदानित घरगुती सिलेंडरची किंमत 494.35 अशी असणार आहे.