नवी दिल्ली - आधार सेवा केंद्र हे आता आठवड्यातील सातही दिवस खुले राहणार आहे. आधार सेवा केंद्रात वाढत असलेली गर्दी लक्षात घेऊन आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) म्हणजेच आधारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मंगळवारी आधार सेवा केंद्र मंगळवारी बंद ठेवण्यात येत होते. आधारने ट्विट करुन यांसदर्भातील माहिती दिलीय. दरदिवसाला 1000 आधार कार्ड इनरॉलमेंट किंवा रिक्वेस्ट्स अपडेट केल्या जातात.
पासपोर्ट सेवा केंद्राच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या आधार सेवा केंद्रात जाण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अपॉईनमेंट घेता येईल. आधार सेवा केंद्रात नवीन आधार कार्डसाठी अर्ज करणे, युआयडीएआय डेटाबेसमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख, लिंग आणि बायमेट्रीक फिंगरप्रींटही बदलू शकतात. आधार सुरू करणाऱ्या संस्थेने 2019 च्या डिसेंबर महिना अखेरपर्यंत 53 शहरात 114 नवीन केंद्र सुरु करण्याची योजना आखली आहे.
जर तुमच्याजवळ आधार केंद्र नसेल तर ?
आधार संस्थेकडून जवळजवळ देशभरात आधार सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. मात्र, जर तुमच्या गावात किंवा जवळील परिसरात आधार केंद्र नसेल, तर बँक, पोस्ट कार्यालय, बीएसएनएल कस्टमर्स सेंटर आणि राज्य सरकारद्वारे निवडण्यात आलेल्या कार्यालयात जाऊन आधार अपडेट आणि नोंदणी करू शकता.