चंद्रयान-3 मिशनचे लॉचिंग 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील स्पेस सेंटरवरून केले जाईल, अशी घोषणा गुरुवारी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (ISRO) केली आहे. इस्रोचे नवे लॉन्च व्हेईकल LVM-3 ही चांद्रयान मोहीम पार पाडेल.
इस्रोने एका ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली, ट्विटमध्ये इस्रोने म्हटले आहे, चंद्रयान-3: एलव्हीएम3-एम4/चंद्रयान-3 मिशन: लॉन्च 14 जुलै, 2023 रोजी दुपारी 2:35 वाजता एसडीएससी (सतीश धवन स्पेल सेंटर), श्रीहरिकोटा येथून होईल.
याशिवाय, इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनीही या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, चंद्रयान-3 मिशन अंतर्गत इस्रो 23ऑगस्ट अथवा 24 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.
चंद्रयान-3 मोहिमेत चंद्र रेजोलिथचे थर्मोफिजिकल गूण, चंद्रवरील भूकंपन, चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा वातावरण आणि लँडरच्या लँडिंग साइटच्या परिसरातील मूलभूत रचनांचे अध्ययन करण्यासाठी काही वैज्ञानिक उपकरणेही असतील.
ही उपकरणे असणार सोबत -चंद्र लॅन्डरला असलेल्या उपकरणांमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी आणि तापमान मोजण्यासाठी 'चंद्र सर्फेस थर्मोफिजिकल एक्स्पेरिमेंट', लँडरच्या लँडिंग साइटच्या परिसरातील भूकंपन मोजण्यासाठी 'इंस्ट्रूमेंट फॉर लूनर सिस्मिसिटी अॅक्टिव्हिटी आणि प्लाझ्माची घनता आणि त्याच्या विविधतेचा अंदाज लावण्यासाठी 'लँगमुइर प्रोब' नावाचे उपकरणही आहे.