नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरातील १ कोटींपेक्षा अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिलासा देत महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला.
हा भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला असून, तो १ जानेवारी २०२३ पासून लागू असेल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. यासाठी सरकारचे १२,८१५ कोटी रुपये खर्च होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाढत्या महागाईच्या काळात डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्याही नजरा डीए वाढीकडे लागल्या आहेत.