शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंगिका येथे दाखल झाले आहेत. यासोबतच त्यांनी किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता जमा झाल्याची माहिती दिली.
पंतप्रधान मोदी यांनी ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२,००० कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले, बाबा अजयबीनाथांच्या या पवित्र भूमीवर महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे. अशा पवित्र काळात, मला देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान निधीचा आणखी एक हप्ता पाठवण्याचे सौभाग्य मिळाले आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त एका क्लिकवर जवळपास २२ हजार कोटी रुपये पोहोचले आहेत.
"साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत..."; देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणाकडे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी लाल किल्ल्यावरून म्हटले आहे की विकसित भारताचे चार मजबूत खांब आहेत. हे आधारस्तंभ आहेत - गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण. केंद्रात असो वा राज्यात, एनडीए सरकार, शेतकऱ्यांचे कल्याण हे आमचे प्राधान्य आहे.
महाकुंभाच्या काळात मंदारचलच्या या भूमीवर येणे हा एक मोठे भाग्य आहे असे पंतप्रधान म्हणाले. या भूमीत श्रद्धा, वारसा आणि विकसित भारताची क्षमता आहे. ही शहीद तिलका मांझी यांची भूमी आहे आणि एक रेशीम शहर देखील आहे. पंतप्रधान मोदींसह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, खासदार गिरिराज सिंह, केंद्रीय मंत्री चिराग पासवान, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी आणि बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल आणि बिहार सरकारचे मंत्री मंगल पांडे व्यासपीठावर उपस्थित आहेत.