शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गुड न्यूज, देशातील कुठल्याही बँकेतून मिळणार ईपीएफओची पेन्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 6:55 AM

EPFO ​​Pension: कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) देण्यात येणारी ‘ईपीएस-९५ पेन्शन’ येत्या जानेवारीपासून देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळू शकेल, अशी घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी केली. 

नवी दिल्ली  - कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) देण्यात येणारी ‘ईपीएस-९५ पेन्शन’ येत्या जानेवारीपासून देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळू शकेल, अशी घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी केली. 

मांडविया यांनी केंद्रीकृत पेन्शन अदायगी प्रणालीच्या (सीपीपीएस) प्रस्तावास मंजुरी दिली आहे. मांडविया हे ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाचे चेअरमनही आहेत. ‘सीपीपीएस’द्वारे कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन वितरित करणे शक्य होईल.  

ईपीएफओच्या ७८ लाखांपेक्षा अधिक ईपीएस-९५ पेन्शनधारकांना याचा लाभ होईल. या प्रणालीमुळे पेन्शन अदायगी आदेश एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात स्थलांतरित करण्याची गरज राहणार नाही. त्याशिवाय संपूर्ण देशात कुठूनही पेन्शन निर्वेधपणे मिळण्याची सोय नव्या प्रणालीत आहे. पेन्शन सुरू करतेवेळी सत्यापनासाठी बँकेच्या शाखेत जाण्याचीही गरज नव्या प्रणालीमुळे राहणार नाही, तसेच पेमेंट जारी होताच तत्काळ पेन्शनधारकाच्या खात्यावर जमा होईल.