शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मोदी सरकारची मोठी भेट; महागाई भत्त्यात 4% वाढ; 2025 पर्यंत मिळणार स्वस्त LPG सिलिंडर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 7:57 PM

आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटची कॅबिनेट बैठक झाली, यात अनेक निर्णय घेण्यात आले.

PM Ujjwala Yojana: आंतरराष्ट्रीय महिला दिन (8 मार्च) आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने LPG सिलिंडरवर मिळणारे अनुदान एका वर्षासाठी वाढवले ​​आहे. सामान्य LPG ग्राहक असो किंवा पीएम उज्ज्वला योजनेचा लाभार्थी असो, दोघांनाही 31 मार्च 2025 पर्यंत LPG  सिलिंडरवर सबसिडी मिळत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी ही माहिती दिली.

31 मार्च 2025 पर्यंत स्वस्त LPG मिळणार29 ऑगस्ट 2023 रोजी मोदी सरकारने महागड्या LPG चा त्रास सहन करणाऱ्या लोकांना एलपीजी सिलिंडर रिफिलिंगवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचा कालावधी 31 मार्च 2024 पर्यंत होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असून, त्यानंतर देशात आचारसंहिता लागू होईल. अशा स्थितीत या योजनेचा कालावधी वाढवणे सरकारला अवघड झाले असते. त्यामुळे सरकारने गुरुवारी(दि.7) मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत LPG सिलिंडरवर सबसिडी देण्याचा निर्णय 31 मार्च 2025 पर्यंत वाढवला आहे.

पीएम उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना 600 रुपयांमध्ये सिलिंडरएलपीजी सिलिंडर रिफिलिंग करण्यासाठी सरकार सर्वसामान्य ग्राहकांना प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी देते. 1100 रुपयांचा घरगुती एलपीजी सिलिंडर 900 रुपयांना उपलब्ध आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना एकूण 500 रुपये अनुदान दिले जाते. म्हणजेच PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना LPG रिफिलसाठी फक्त 600 रुपये द्यावे लागतात. 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढकेंद्र सरकारने मोठा निर्णय घेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी (DA hike) वाढ केली आहे. आता महागाई भत्ता 50 टक्के झाला असून, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या वाढीचा फायदा होईल. ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे.

या निर्णयांनाही मान्यता देण्यात आली आहेमंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना पीयूष गोयल म्हणाले की, मंत्रिमंडळाने 5 वर्षांसाठी 10371.92 कोटी रुपयांच्या खर्चासह 'इंडिया एआय मिशन'ला मंजुरी दिली आहे. तागाच्या दराबाबतही मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला. त्यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षात तागाच्या एमएसपीमध्ये 122 टक्के वाढ झाली असून, त्याचा फायदा 44 लाख ताग उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचा फायदा विशेषत: भारतातील पूर्वेकडील प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि ओरिसा येथील शेतकऱ्यांना होणार आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा