नवी दिल्ली - भारतीय महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिलांच्या जीवघेण्या आजारात सर्वाधिक परिणाम गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होतो. आता या गर्भशयाच्या कर्करोगावर पुढील वर्षी भारतात लस येणार असून त्यामुळे महिलांना त्याचा फायदा होणार आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान सर्व्हावॅक ही ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लस येईल अशी माहिती कोरोना वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन के अरोडा यांनी दिली आहे.
डॉ. एन. के अरोडा यांनी सांगितले की, या HPV लसीची किंमत देशात सध्या असलेल्या इंटरनॅशनल मेडिकल ब्रँड लसीच्या दहा पट कमी असेल. त्यामुळे या लसीचा लाभ गरीबांना सहजरित्या होईल. २-३ कंपन्या भारतात गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यात सर्वात पुढे आहे. सीरमला लस प्राधिकरणाने परवानगी दिली असून ही लस २०२३ मध्ये एप्रिल किंवा मे मध्ये उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्याचसोबत गर्भाशयाच्या कर्करोगामुळे सर्वात जास्त मृत्यू भारतात होतो. मागील २४ तासांत देशात ९५ ते १०० महिलांना या कर्करोगामुळे जीव गमवावा लागलाय. जागतिक पातळीवर दरवर्षी ८० हजाराहून अधिक प्रकरण गर्भाशयाच्या कर्करोगाबाबतीत येतात. जगात एकूण तुलनेत २५ टक्के रुग्ण भारतात आढळतात. दरवर्षी १ लाख महिलांमध्ये २२ रुग्णांचा मृत्यू गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होतो. भारतीय महिलांच्या मृत्यूसाठी कारण असलेल्या आजारांमध्ये गर्भाशयातील कर्करोग दुसऱ्या नंबरवर आहे.
३५ वयानंतर महिलांची नियमित चाचणी विशेष म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग लसीकरणाद्वारे पूर्णत: बरा होऊ शकतो. या कर्करोगामुळे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस बनतो. त्याला रोखण्यासाठी व्हॅक्सिन उपलब्ध आहे. वयाच्या ३५ नंतर महिलांनी गर्भाशयाच्या कर्करोगासाठी नियमित चाचणी करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून सुरुवातीच्या स्टेजवरच त्याचे निदान करता येईल. ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रातही होते असं डॉ. अरोडा यांनी म्हटलं.
९ ते १४ वर्षीय मुलींचं लसीकरण सरकार करणारपुढील चार पाच महिन्यात HPV लस निर्माण करून भारत या रोगावरची लस उत्पादित करणाऱ्या देशांच्या यादीत असेल. केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातंर्गत ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेचा कार्यक्रम हाती घेईल. या लसीची किंमत लोकांच्या खिशाला परवडेल अशी म्हणजे २०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान असणार आहे असं डॉ. एन के अरोडा यांनी सांगितले.
प्रमुख मुद्दे
२०२० साली जगामध्ये ६.४ लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता.३.४२ लाख महिलांचा २०२० मध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाने मृत्यू१ लाख महिलांना भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग व काही हजार रुग्णांचा मृत्यू.१५ ते ४४ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.