नवी दिल्ली : केरळमध्ये १ जून या अपेक्षित तारखेच्या दोन दिवस आधीच शनिवारी मान्सून दाखल झाला असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. मात्र, मान्सूनचे आगमन झाल्याच्या वृत्ताला हवामान खात्याने दुजोरा दिलेला नाही.
देशातील शेतीसाठी पावसाचे चार महिने महत्त्वाचे असतात. त्यामुळे केरळमध्ये मान्सून दाखल होणे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.स्कायमेटने टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, मान्सून एखाद्या भागात दाखल होताना वेगाने वारे वाहणे, पाऊस पडणे अशा काही गोष्टी घडतात. केरळने शनिवारी त्याचा अनुभव घेतला. हवामान खात्यानेही १ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज या आठवड्याच्या प्रारंभी वर्तविला. या राज्यात मान्सून ५ जून रोजी दाखल होईल, असे भाकीत याआधी हवामान खात्याने वर्तविले होते.