इस्रोच्याचंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला. या मिशनसंदर्भात रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता चंद्रयान-3 मिशनचे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने ऊर्जा मिळवत आहे, असे सांगण्यात येत आहे. टीओआय रिपोर्टनुसार, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अध्यक्ष अजीत कुमार मोहंती यांनी यासंदर्भात पुष्टी केली आहे. भारताचे उणूऊर्जा क्षेत्र एवढ्या महत्वाच्या अंतराळ मिशनचा भाग होऊ शकते, याचा अत्यंत आनंद असल्याचे मोहंती यांनी म्हटले आहे.
प्रोपल्शन मॉड्यूलसंदर्भात माहिती देताने इस्रोचे अधिकारी म्हणाले, प्रोपल्शन मॉड्यूल दोन रेडिओ आइसोटोप हीटिंग युनिट्स (RHU) ने सुसज्ज आहे. ते भाभा अणुसंशोधन केंद्राने (BARC) डिझाइन केले आहे. ते एक वॅट एवढी उर्जा निर्माण करते. आरएचयूच्या मदतीने अंतराळ यानाला आवश्यक तापमान जनरेट करण्यास मदत मिळेल.
व्रिकम आणि प्रज्ञान जागे होतील?चंद्रयान-3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर पी वीरमुथुवेल यांनी म्हटले आरहे की, इस्रो भविष्यात रोव्हर आणि लँडरला मेन्टेन करण्यासाठी प्रोपल्शन मॉड्यूलच्या आण्विक संसाधनांचा वापर करू शकते. अर्थ भविष्यात लँडर आणि रोव्हरद्वारे सिग्नल मिळविण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.