नवी दिल्ली : कोरोना काळात अडकलेल्या मजुरांना राज्याराज्यात पोहोचविण्यासाठी रेल्वेने श्रमिक ट्रेन सुरु केल्या होत्या. यानंतर दिल्ली ते अन्य शहरांना जोडणाऱ्या राजधानी ट्रेनही सुरु केल्या आहेत. यानंतर आता रेल्वे विशेष ट्रेनही सुरु करणार असून याला नेहमीप्रमाणे वेटिंग लिस्टही दिली जाणार आहे.
या आधी सोशल डिस्टंसिंग पाळून एका रेल्वेतून १२०० मजुर अशा रेल्वे त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यात आल्या होत्या. तसेच राजधानी एक्स्प्रेसही सोडण्य़ात आल्या होत्या. अद्यापही देशभरात विविध भागांत लोक अडकलेले आहेत. यामुळे रेल्वेचे बुकिंगही फुल होत आहे. यासाठी रेल्वेने आणखी काही स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार या रेल्वे गाड्यांमध्ये वेटिंगही असणार आहे. मात्र, हे वेटिंग नेहमीप्रमाणे नसून मर्यादित असणार आहे. ही यादी २२ मे पासून जारी केली जाणार आहे. 1AC साठी २०, एक्झिक्युटीव्ह क्लाससाठी २०, सेंकड एसीसाठी ५०, थर्ड एसीसाठी १०० तसेच एसी चेअर कारसाठी १००, स्लीपरसाठी २०० असे वेटिंग ठेवण्यात आले आहे. याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या....
मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
बाबो! तब्बल दोन महिन्यांनी दुकाने, सिनेमा गृहे उघडली; अवस्था पाहून शॉक बसेल
रेडमीचे फोन पुन्हा महागले; दीड महिन्यांतील मोठी वाढ
सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांच्याकडून मुदतवाढ