नवी दिल्ली- हिंदीतल्या महान कवयित्री, स्वातंत्र्य सेनानी आणि महिला अधिकारांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणा-या महादेवी वर्मा यांना गुगलनं डुडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. 27 एप्रिल 1982मध्ये महादेवी वर्मा यांना भारतीय साहित्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार दिला आहे. या गुगल डुडलला कलाकार सोनाली जोहरा हिनं बनवलं होतं.या डुडलमध्ये प्रसिद्ध कवयित्रीच्या हातात डायरी आणि पेन असल्याचं दाखवण्यात आलं आहे. महादेवी वर्मा यांना मॉर्डन मीरा असंही संबोधलं जातं. महादेवी वर्मा यांचा जन्म 26 मार्च 1907मध्ये उत्तर प्रदेशातल्या फारुखाबादमध्ये झाला आहे. 1916मध्ये 9 वर्षांच्या वयातच त्यांचा विवाह झाला होता. परंतु विवाहानंतर तिनं स्वतःच्या आई-वडिलांच्या घरी राहणंच पसंत केलं आणि तिनं अलाहाबाद क्रॉसवाइट गर्ल्स स्कूलमध्ये स्वतःचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं.गुगलच्या ब्लॉगनुसार, आई-वडिलांनी महादेवी यांना पुढे शिक्षण चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. त्यांच्या आईनंच संस्कृत आणि हिंदी लिहिण्यास प्रेरणा दिली आहे. संस्कृतला त्यांनी पहिली पसंती दिली. त्यानंतर त्या कवयित्री म्हणून नावारूपाला आल्या.
गुगलनं प्रसिद्ध कवयित्री महादेवी वर्मांना डुडलच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 12:10 PM