नवी दिल्ली : नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या देवभूमी केरळच्या मदतीसाठी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. केरळच्या पुनर्वसनासाठी गुगल कंपनी सात कोटी रुपयांची मदत करणार आहे.
भारतामध्ये एक गुगलचा कार्यक्रम झाला. यावेळी गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी सांगितले की, केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी Google.org आणि Googlers मिळून सात कोटी रुपयांचा निधी देणार आहे. गुगल क्राइसिस रिस्पॉन्स टीमने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक उपाय योजले आहेत. तसेच, अनेक उपाय योजनासह पुरात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गुगलने Google Person Finder टूल विकसित केले आहे, असेही राजन आनंदन सांगितले.
(पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी केरळ दौऱ्यावर)
केरळमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 417 लोकांचा मृत्यू झाला. 22 लाख 31 हजार 139 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 1500 कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. राज्यातील अलप्पुझा, एर्नाकुलम आणि त्रिसूर जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.