ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 27 - सर्च इंजिनमध्ये नंबर वन असलेल्या गुगलला युरोपियन युनियननं 2.7 अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे. युरोपियन युनियननं गुगलवर इंटरनेट सर्चचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवला आहे. गुगलनं सर्च इंजिनचा दुरुपयोग करत एका शॉपिंग सर्व्हिसला फायदा पोहोचवल्याचा आरोप करत 2.7 अब्ज डॉलर म्हणजेच 270 कोटींचा दंड ठोठावला आहे. द गार्डियन्सच्या वृत्तानुसार, युरोपीय संघाचे अधिकारी येत्या आठवड्यात बाजारावर अधिपत्य गाजवणा-या मोठ्या कंपन्यांना दोषी करार देण्याची शक्यता आहे. युरोपियन संघ गुगलच्या सर्च इंजिनमध्ये बदल करण्याची मागणी करू शकतो. जेणेकरून गुगल सर्च रिझल्टमध्ये स्वतःच्या सेवेत पक्षःपातीपणा करणार नाही. या प्रकरणाची चौकशी 2010 रोजी सुरू झाली. प्राइज-कंपॅरिझनसह इतर वेबसाइटच्या तक्रारीनंतर गुगलनं त्यांना सर्च रिझल्टवरून हटवलं होतं. त्यानंतर युरोपियन संघानं गुगलवर कारवाई करण्यास सुरुवात केली. गुगलचा युरोपात इंटरनेट सर्चमध्ये 90 टक्के शेअर आहे. त्यामुळे गुगल युझर्सला सर्च इंजिनच्या सहाय्यानं कोणत्याही वेबसाइटवर पाठवू शकतो. गुगल एक पॉवरफूल टूल असून, त्याच्यात युझर्सला नेव्हिगेट करण्याची क्षमता आहे. ऑनलाइन शॉपिंग कंपनीच्या वेबसाइटचा ग्राहक आणि रिटेलर्स दोघांनाही फायदा होतो. असं सांगत गुगलनंही स्वतःची बाजू मांडली आहे. तसेच कमिशनच्या मुद्द्यावरून गुगल प्रतिस्पर्ध्यांविरोधात केसेसही लढतोय. त्यात कंपनीला मोठा दंड द्यायला लागू शकतो. गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटला गेल्या वर्षी 90 अब्ज डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता.
इंटरनेट सर्चचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुगलला ठोठावला 2.7 अब्ज डॉलरचा दंड
By admin | Published: June 27, 2017 6:59 PM