कोच्ची: केरळमधील कोच्ची शहराच्या पश्चिमी तटाजवळ अरबी समुद्रात एक नवं बेट दिसू लागलं आहे. हे बेट पाण्याखाली असून गुगल मॅप्स सॅटेलाईट इमेजरीच्या माध्यमातून ते दिसून आलं आलं आहे. पाण्याखाली असलेल्या बेटाचा आकार पश्चिम कोच्चीच्या तुलनेत निम्मा आहे. समुद्रात बेटाची कोणतीही दृश्यरचना न मिळाल्यानं तज्ज्ञदेखील हैराण झाले आहेत. केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीजचे (केयूएफओएस) अधिकारी याबद्दल अधिक संशोधन करत आहेत.७ आंब्यांसाठी ४ रखवालदार अन् ६ कुत्रे तैनात; असं आहे तरी काय आंब्यांत? किंमत ऐकून चक्रावून जाल
चेलनम कार्शिका पर्यटन विकास सोसायटीच्या नावाच्या संघटनेनं केयूएफओएसच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिल्यानंतर त्यांना याबद्दलची माहिती मिळाली. त्याआधी महिन्याच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष वकील के. एक्स. जुलप्पन यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी अरबी समुद्रातील रहस्यमय बेट दाखवणारे गुगल मॅप्सचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. पाण्याखाली असलेले बेट कोच्चीच्या किनाऱ्यापासून ७ किलोमीटर पश्चिमेला आहे. या बेटाची लांबी ८ किमी आणि रुंदी ३.५ किलोमीटर असल्याचा दावा जुलप्पन यांनी केला आहे.बाबो! एका आंब्याची किंमत २.७० लाख; कृषी अधिकारी हैराण, पाहणी करणार
कशी झाली बेटाची निर्मिती?कोच्ची शहरापासून ७ किलोमीटर दूर असलेल्या बेटाची निर्मिती कशी झाली यावर प्रकाश टाकण्याचं काम सुरू असल्याची माहिती केयूएफओएसचे कुलगुरू रिजी जॉन यांनी दिली. 'गुगल मॅप्समध्ये पाहिल्यावर कोच्ची जवळ समुद्राखाली पाण्यात एक बेट दिसून येतं. हे बेट कशापासून तयार झालं आहे याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. वाळू किंवा मातीपासून हे बेट तयार झालं असावं अशी शक्यता आहे. याबद्दल संशोधन होणं गरजेचं आहे,' असं जॉन यांनी सांगितलं.