शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गोपाळ देवकर यांची सभापतीपदी निवड बिनविरोध : जिल्हा मजूर फेडरेशन उपसभापतीपदी प्रकाश पाटील

By admin | Published: February 10, 2016 12:30 AM

जळगाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीसाठी मंगळवारी बैठक झाली. सभेत जि.प.सदस्य गोपाळ देवकर यांची सभापतीपदी तर प्रकाश एकनाथ पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

जळगाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीसाठी मंगळवारी बैठक झाली. सभेत जि.प.सदस्य गोपाळ देवकर यांची सभापतीपदी तर प्रकाश एकनाथ पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र सहकारी संस्थातील तरतुदीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाडवी यांनी सभापती व उपसभापती निवडीसाठी मंगळवारी संचालक मंडळाची सभा बोलविली होती. यात सभापतीपदासाठी गोपाळ देवकर यांचा तर उपसभापतीपदासाठी पाचोरा येथील प्रकाश पाटील यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पदाधिकारी निवडीच्या सभेला नवनिर्वाचित संचालक बळीरामदादा सोनवणे, लीलाधर तायडे, अशोक महाजन, रोहिदास पाटील, राजेंद्र कोलते, भगवान पाटील, अजय पाटील, एकनाथ पाटील, मधुकर पाटील, ईश्वर पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, वाल्मिक पाटील, समीर पाटील, बाबूराव घोंगडे, घन:श्याम खैरनार, भानुमती रमेश पाटील, जयश्री धिरेंद्र पाटील तसेच संस्था प्रतिनिधी अजय सोनवणे, आर.डी.पाटील, खुशाल चव्हाण, सुजित शिंदे, संजय येवले, भाग्येश ढाकणे, संजय पाटील, धिरेंद्र पाटील, रमेश शिंदे, मिलिंद सोनवणे, चुनीलाल पाटील, डी.डी.पाटील उपस्थित होते.