शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

गोरक्षकांचा धुडगूस, रस्तारोको

By admin | Published: June 13, 2017 1:53 AM

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून ५० गोरक्षकांनी महामार्ग क्रमांक १५ वर रविवारी रात्री धुडगूस घातला. त्यांनी गायींची

- लोकमत न्यूज नेटवर्क

जयपूर : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून ५० गोरक्षकांनी महामार्ग क्रमांक १५ वर रविवारी रात्री धुडगूस घातला. त्यांनी गायींची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींवर (ट्रक) तुफान दगडफेक करण्यासह वाहतूक रोखून धरली. वस्तूत: तामिळनाडूच्या पशुसंवर्धन विभागाने जैसलमेर येथून ५० गायी आणि कालवडींची खरेदी केली होती आणि विभागाचे अधिकारी त्यांना पाच मालमोटारींतून तामिळनाडूला नेत होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि कागदपत्रे त्यांनी मिळविली होती. याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली असून, घटना गांभीर्याने न घेतल्यामुळे पोलीस निरीक्षकांसह सात पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा, त्याचप्रमाणे मालमोटारी पेटविण्याचाही प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांना रोखले. त्यानंतर तमिळ अधिकारी, ट्रकचालक आणि क्लीनर्स यांना गोरक्षकांच्या ताब्यातून सोडवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अनेक लोक घटनास्थळी गोळा झाले आणि त्यांनी महामार्ग क्रमांक १५ वर ठिय्या मारून वाहतूक अडविली, असे बारमेरचे पोलीस अधीक्षक गगनदीप सिंगला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.तमिळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी जैसलमेरमधील विविध ठिकाणांहून उत्तम वंशाच्या गायींची खरेदी केली होती. त्यांनी गायींच्या वाहतुकीसाठी उपविभागीय अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याकडून नाहरकत प्रमाणपत्रांसह इतर परवानग्या प्राप्त केल्या होत्या. ५0 जणाविरुद्ध गुन्हा दाखलआरोपींनी मालमोटारींवर तुफान दगडफेक करून एका मालमोटारीचे नुकसान केले. मालमोटारीतील गायींना तात्पुरते स्थानिक गोशाळेत ठेवण्यात आले आहे, असे ते म्हणाले. ५० लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चैनराम, कमलेश, विक्रम आणि जसवंत यांना सोमवारी अटक करण्यात आली. तामिळनाडूच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे मदतीची मागणी केली. तथापि, पोलीस कर्मचारी उशिरा घटनास्थळी आले. ही बाब समजल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्यावरून सदर पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखांसह सात पोलिसांच्या पोलीस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या.