नवी दिल्ली : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील विचारांनी चर्चेत आलेली दिल्ली विद्यापीठाची (डीयू) विद्यार्थिनी गुरमेहर कौरसाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर मैदानात उतरला आहे, तर कौरची टिंगल केल्याबद्दल टीका सुरू झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागलाही बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले. डीयूतील राड्यानंतर गुरमेहरने अभाविपविरुद्ध सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. तिच्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्यानंतर काहींनी तिला बलात्काराची धमकी दिली होती. शहीद जवानाची मुलगी असलेल्या गुरमेहरच्या विचारांची टिंगल करणे किंवा ट्रोलिंग करणे अत्यंत घृणास्पद होते, असे गंभीरने म्हटले आहे. एआयएसए या संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या दोन जणांना अभाविपने संघटनेतून काढले आहे. त्या दोघांनी पोलिसांसमोरच एआयएसएच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सेहवागनेही तिची टर उडविणारी टिपणी केली होती. मात्र, आता त्याने टिष्ट्वट करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिला तिची मते मांडण्याचा अधिकार आहे. तिला हिंसाचाराची किंवा बलात्काराची धमकी देणारे क्षुद्र आहेत. फोगट भगिनी असतील किंवा गुरमेहर. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहेच, असे टिष्ट्वट सेहवागने केले. आपण एका स्वतंत्र देशात राहतो. येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. युद्धात पिता गमावलेली एखादी मुलगी शांतता राहावी या उद्देशाने युद्घाच्या भयानकतेविषयी पोस्ट टाकत असेल, तर तिला तो पूर्ण अधिकार आहे, असे गंभीरने एका निवेदनात म्हटले आहे. कन्हैयाकुमारविरुद्ध पुरावे नाहीतगेल्या वर्षी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या आंदोलनाच्या वेळी विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केलेले भाषण देशद्रोही होते, असे कोणतेही पुरावे दिल्ली पोलिसांना आढळलेले नाहीत. पोलिसांनीच ही माहिती न्यायालयात दिली आहे. आंदोलनानंतर पोलिसांनी कन्हैयाकुमार व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचा आरोप ठेवला होता आणि त्यांना काही काळ कोठडीतही ठेवले होते. त्यावेळी त्याला न्यायालयात नेताना भाजपशी संबंधित काही वकिलांनी त्याला मारहाणही केली होती. आता त्याच्यावर देशद्रोहाचे आरोप नाहीत, असे पोलिसांनी सांगितल्याने त्याच्या विरोधकांची पंचाईत झाली आहे. >जेएनयू विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततापूर्णनिदर्शक विद्यापीठ कॅम्पसमधील प्रशासकीय विभाग बंद पाडत होते, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रशासनाने दिल्ली उच्च न्यायालयात केला असताना पोलिसांनी मात्र जेएनयूत विद्यार्थ्यांनी शांततेने आंदोलन केल्याचे न्यायालयात सांगितले. हा विषय न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थी प्रशासकीय इमारतीपासून ५० मीटर अंतरावर आंदोलन करीत होते, असे सांगितले. कुलगुरू, शिक्षक आणि जेएनयूचे कर्मचारी कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रशासकीय इमारतीचा वापर करीत होते, असेही पोलिसांनी सांगितले.
गुरमेहरसाठी गंभीर मैदानात
By admin | Published: March 02, 2017 4:06 AM