- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सतत संवैधानिक संस्थांचा वापर आपल्या राजकीय हितासाठी व जे लोक सरकारच्या धोरणाशी सहमत नाहीत त्यांना त्रास देण्यासाठी करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.सीबीआय, एनआयए, ईडीसारख्या संस्थांचा यासाठी गैरवापर होत असल्यामुळे देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असे पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी म्हटले. सोनिया गांधी म्हणाल्या की, सरकारच्या वर्तनाने लोकशाही संकटात सापडली आहे. कारण लोकांचे मूलभूत अधिकार, विचारांना दडपले जात आहे. कोणाला देशद्रोही, कोणाला दहशतवादी, तर कोणाला राष्ट्रविरोधी ठरवले जात आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर या देशाने लोकशाहीचा जो पाया घातला तो हलताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी सूडभावनेने काम करीत आहेत.
सरकार संवैधानिक संस्थांचा गैरवापर करतेय -सोनिया गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 3:20 AM