शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

सरकारच्या घोषणांची काँग्रेसकडून वरात

By admin | Published: May 27, 2015 12:05 AM

आघाडी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसतर्फे मंगळवारी दिल्लीसह देशभरात आंदोलनाद्वारे सरकारच्या धोरणांना विरोध करण्यात आला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसतर्फे मंगळवारी दिल्लीसह देशभरात आंदोलनाद्वारे सरकारच्या धोरणांना विरोध करण्यात आला. दिल्लीत युवक काँग्रेसने मोदी सरकारच्या घोषणांची वरात काढली. सरकारच्या विविध घोषणांचे फलक घेऊन कार्यकर्ते या वरातीत सहभागी झाले होते. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जंतरमंतर येथे मोदी व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नारेबाजी करून त्यांचे पुतळे जाळले. गुजरातेत कार्यकर्ते ताब्यातअहमदाबादेत सत्ताधारी पार्टीच्या शहर कार्यालयाबाहेर व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जुन्या निवासस्थानाजवळ केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या दोनशेवर कार्यकर्त्यांना काही काळासाठी ताब्यात घेण्यात आले. लखनौमध्ये पुतळा जाळलाउत्तर प्रदेश युवक काँग्रेसने मोदी सरकारला वर्षभराच्या कार्यकाळात आलेल्या अपयशांचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठी लखनौ येथील विधानभवनासमोर सूटबूट घालून मोर्चा काढला आणि पंतप्रधान मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. दरम्यान, जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारला प्रत्येक आघाडीवर आलेले अपयश उघड करण्यासाठी जम्मूतील प्रेस क्लबपुढे सूटबूट घालून निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जोरदार नारेबाजी केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रणव शगोत्रा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.४गत दहा वर्षांत आपल्या सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी करणाऱ्या काँग्रेसने यावेळी विरोधी बाकांवरून मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यांकन करीत, गत वर्षभरात रालोआ सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा दावा केला.४मंगळवारी काँग्रेसने ‘एक साल, देश बदहाल, ये है सूट-बूट की सरकार’ या शीर्षकाखाली मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी केले. ४काँग्रेस मुख्यालयात एका मॅराथॉन पत्रपरिषदेत गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला आदी काँग्रेस नेत्यांनी यानिमित्ताने भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकार एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. यात सरकार नावाची कुठलीही गोष्ट नाही. सरकारने काम केले असते तर ते दाखवले असते. पण पंतप्रधान मोदी हे तर केवळ चित्रपटाचे प्रयोग करीत सुटले आहेत, अशी टीका या नेत्यांनी केली. बडेजाव, खोटी आश्वासने, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष अशा प्रकारचे सात मुद्दे ऐकवत, मोदी सरकार देशातील जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप काँग्रेसने यावेळी केला. याबाबतचे कागदोपत्री पुरावेही काँग्रेसने दिले. मोदी, राजनाथसिंग, अरुण जेटलीसह भाजपाचे नेते निवडणुकीआधी काय बोलत होते आणि आता काय बोलत आहेत, हे दाखवणारा एक लघुपटही काँग्रेसने यावेळी प्रसारित केला.बॉक्स-मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.‘मटकल में वो आते हैं खंजर बदल -बदल कर , या रब मैं कहाँ से लाऊँ सर बदल -बदल कर ’अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर उपहासात्मक बाण सोडले.- राजकारणापासून गुन्हेगारांना दूर ठेवल्याचा दावा मोदी सरकार करते. पण सरकारच्या २० मंत्र्यांवर गंभीर फौजदारी गुन्हे आहे,असा आरोपही काँग्रेसने केला.४मोदी सरकारचे अनेक चेहरे आहेत, जे वेळोवेळी बदलतात. महागाई संपली असे सरकार म्हणते, असे असेल तर डाळी, दूध, फळे, मांस, रेल्वे भाडे महाग का? असा सवाल गुलाम नबी आझाद यांनी केला.