नवी दिल्ली: घरगुती तथा देशी कंपन्यांसाठी कॉपोरेट कराचे प्रमाण 22 टक्क्यांपर्यंत आणि अन्य उत्पादक कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचे प्रमाण 15 टक्क्यांर्पयत खाली आणण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून आज ( शुक्रवारी) जाहिर करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत टीका केली आहे.
केंद्र सरकारकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याच्या निर्णयाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकीत होणाऱ्या ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाशी जोडला आहे. ह्युस्टन येथे होणारा कार्यक्रम हा 1.4 लाख कोटींच्या खर्चाचा असून जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा कार्यक्रम असल्याचे राहूल गांधींनी सांगितले. तसेच सरकारचा कोणताही कार्यक्रम किंवा एखादा मोठा निर्णय देशाची आर्थिक परिस्थिती लपवू शकत नसल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे.
दरम्यान 1 ऑक्टोबर 2019 रोजी किंवा त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नवीन गुंतवणूक करणाऱ्या देशांतर्गत कंपनीला 15 टक्के प्रमाणो प्राप्ती कर भरण्याची सवलत देण्यात आली आहे. कर सवलतींचा लाभ घेणारी कंपनी पूर्व- सुधारित दराने कर भरणो सुरू ठेवेल. तथापि, या कंपन्या कर सवलत कालावधी संपल्यानंतर सवलतीच्या कर व्यवस्थेची निवड करू शकतात. पर्यायाच्या प्रयोगानंतर ते 22 टक्के दराने कर भरण्यास जबाबदार ठरतील आणि एकदा वापरलेला पर्याय नंतर मागे घेता येणार नाही. यापुढे ज्या कंपन्या सवलत मिळवत आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी किमान पर्यायी कराचा दर सध्याच्या 18.5 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आला आहे.