नवी दिल्ली- सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सीबीआय प्रमुख पदावरून हटविल्यानंतर सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांचा कार्यकाळ घटवला आहे. केंद्रानं अस्थाना यांच्यासमवेत चार अधिकाऱ्यांच्या सेवेतील कार्यकाळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी नियुक्ती समितीची बैठक निवासस्थानी बोलावली होती. या नियुक्ती समितीमध्ये तीन सदस्य असतात. या समितीमध्ये काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा देखील समावेश आहे. या नियुक्ती समितीच्या बैठकीत अस्थाना यांच्यासह सीबीआयचे अरुणकुमार शर्मा, मनीष कुमार, पोलीस अधीक्षक जयंत जे. नाइकनवरे या चार अधिकाऱ्यांचा सेवाकाळ घटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आलोक वर्मा यांच्यानंतर राकेश अस्थानांसह चार अधिकाऱ्यांवर कोसळली कुऱ्हाड, सेवाकाळ घटवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 10:09 PM