नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत कांद्यांचा पुरवठा वाढविण्यासाठी सरकारने तुर्की देशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्कीमधून 11,000 कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कांद्याचे भाव सध्या 90 ते 100 रुपये असून दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढत आहे. तसेच दिल्लीमध्ये अधिकृत नोंदणीनूसार 82 रुपये प्रतिकिलो कांद्याचे भाव सध्या सुरु आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तुर्कीमधून कांदा आयात झाल्यानंतर कांद्याचे भाव कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमटीसीने तुर्की येथून 11,000 टन कांद्याच्या आयातीचा करार केला असून पुढील वर्षी जानेवारीत कांद्याची आयात होईल असं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सरकारने इजिप्तकडून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानूसार एमएमटीसीने 6090 कांद्याची ऑर्डर दिली होती. परंतु कांद्याची पहिली फेरी 12 डिसेंबरपर्यत भारतात पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कांद्याच्या किंमतींवर नजर ठेवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा एक गट तयार करण्यात आला आहे. अर्थमंत्री, ग्राहक व्यवहार मंत्री, कृषीमंत्री आणि रस्ते वाहतूक मंत्री हेही या पॅनेलचे सदस्य आहेत. सचिवांची समिती (सीओ) आणि ग्राहक व्यवहार सचिव अविनाश के. श्रीवास्तव यांच्याकडून सतत परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.