ह्रॅलो-३ हरमलातील गतिरोधकाबाबत शासन उदासीन ग्रामस्थांत नाराजी
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
हरमल : येथील पंचायत क्षेत्रातील अधिकतर अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक निर्माण करावेत, अशा आशयाचे ग्रामसभा ठराव मंजूर करून पाठविल्यास वर्षे उलटली. तरीही शासन दखल घेत नसल्याने खात्याच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हरमल : येथील पंचायत क्षेत्रातील अधिकतर अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक निर्माण करावेत, अशा आशयाचे ग्रामसभा ठराव मंजूर करून पाठविल्यास वर्षे उलटली. तरीही शासन दखल घेत नसल्याने खात्याच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अलीकडे हरमल पंचायत क्षेत्रातील तिठानजीकचे मासळी मार्केट बामणभाटी आगरनजीक स्थलांतर केले. तिठा भागातील वाहतूक कोंडी सुटली आणि दररोजची कटकट दूर झाली, असे वाटत होते. तरीही सध्या मार्केटनजीक वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करून ठेवीत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अपघाताची श्क्यता अधिक असल्याने माजी पंच दिलीप वस्त यांनी गतिरोधक उभारण्याच्या ठराव मंजूर करून घेतला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय त्याबाबत उदासीन असल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करतात. मुख्य रस्ता ते खालचावाडा समुद्रकिनारा रस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो. या रस्ता मार्गात प्रवीण वायंगणकर यांच्या निवासस्थानासमोरील धोकादायक वळणावर दर पर्यटन हंगामात कित्येक अपघात घडत असतात. त्या प्रकारच्या अपघाताची दखल घेत प्रवीण वायंगणकर यांनी १० वर्षांपूर्वी त्या धोकादायक वळणावर गतिरोधक उभारण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला होता. संबंधित खात्यास तो मंजुरीसाठी पाठविला; परंतु खात्याने अद्याप त्याची दखल घेतली नाही. दरम्यान, अलीकडे साधारण नारायणदेव जंक्शन, बामणभाटी शंकर नाईक, शंभू वायंगणकर यांच्या निवासस्थानानजीक, मधलावाडा मेथर यांच्या निवासस्थानाजवळ, केपकरवाडा वळणावर आदी ठिकाणी गतिरोधकाची मागणी आहे. मात्र, मांद्रे पंचायत क्षेत्रात काही गतिरोधक अनावश्यक वाटतात. हे गतिरोधक निर्माण करताना हरमल पंचायत क्षेत्राचा विचार केला नसल्याने संबंधित खाते निष्क्रिय असल्याची टीका नागरिक करतात. तरी जिल्हाधिकारी व वाहतूक खात्याने हरमल ग्रामस्थांच्या मागणीची दखल घ्यावी, अशी मागणी सर्व लोकांनी केली आहे. (प्रतिनिधी)