शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CNG, PNG चे चढे दर कोसळणार; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा दिलासादायक निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 5:45 PM

तुम्ही जर सीएनजी वाहन चालवत असाल किंवा तुमच्या घरी पीएनजी कनेक्शन असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घट होण्याची दाट शक्यता आहे.

नवी दिल्ली- 

तुम्ही जर सीएनजी वाहन चालवत असाल किंवा तुमच्या घरी पीएनजी कनेक्शन असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घट होण्याची दाट शक्यता आहे. सरकारनं या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे सातत्यानं वाढणाऱ्या सीएनजी आणि पीएनजीच्या दरांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

वाढत्या किमतींमुळे बजेट बिघडलंगेल्या दिवसांपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. वाढत्या दरांमुळे महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत आहे आणि खर्चावर याचा परिणाम होत आहे. अशातच सरकारनं जनतेला दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायूच्या एकूण निर्मितीपैकी काही वाटा इंडस्ट्री किंवा उद्योगांपासून शहरी गॅस वितरण कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घसरण होऊ शकते. 

सरकारनं एवढा वाटा राखीव केलापेट्रोलियम मंत्रालयानं बुधवारी या संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार याआधीच्या आदेशात संशोधन करुन गॅस वितरण कंपन्यांना घरगुती स्तरावर वापरण्यात येणाऱ्या गॅससाठीच्या आरक्षित वाट्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत दिल्लीत इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि मुंबईत महानगर गॅस लिमिटेड यांसारख्या शहरी गॅस वितरक कंपन्यांसाठीचा राखीव वाटा १.७५ कोटी घनमीटर प्रतिदीन यात वाढ करुन तो २.०७८ कोटी घनमीटर इतका करण्यात आला आहे. 

शहर गॅस वितरक कंपन्यांना घरगुती गॅसचा पुरवठा आता उपलब्धतेच्या आधारावर किंवा सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या वाहतुकीसाठी 'गेल'ला केलेल्या वाटपाच्या आधारावर केला जाईल, असेही अधिसूचनेत म्हटले आहे. मागील तिमाहीतील वापराच्या पातळीच्या तुलनेत पुरवठा 102.5 टक्के इतका होता.

वाटप वाढल्यामुळे फायदा काय होणार?सरकारच्या नव्या निर्णयाचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. सध्या शहरी गॅस वितरक कंपन्यांसाठी दिला जाणारा गॅस पुरवठा एकूण मागणीच्या ८३ टक्के इतका होता. उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी जास्तीची किंमत देऊन एलएनजी आयात करावा लागत होता. 

टॅग्स :businessव्यवसाय