नवी दिल्ली, दि. 12 - केंद्र सरकारनं कर्मचा-यांना एक खूशखबर दिली आहे. केंद्रानं कर्मचारी व सेवानिवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 1 टक्क्यानं वाढ केली असून, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचा-यांना मिळणारा महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर जाणार आहे. 1 जुलैपासून हा नवा नियम लागू होणार आहे.केंद्राच्या या निर्णयाचा 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 61 लाख सेवानिवृत्त वेतनधारकांना फायदा पोहोचणार असून, कर्मचा-यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार आहे. केंद्रानं महागाई भत्ता एका टक्क्यानं वाढवल्यामुळे आता कर्मचा-यांना मूळ वेतन 5 टक्क्यांनी वाढून मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (8 महिन्यांच्या) जुलै 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनासुद्धा याची भरपाई देण्यात येणार असून, सरकारी तिजोरीवर 3,068.26 व 2,045.50 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए जुलै 2016 पासून 2 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा करण्याच्या तयारीत होती. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेस आला. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात आला.महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवावाकेंद्रीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष के. के. कुट्टी यांनी सांगितले की, ‘औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक मूल्यांक निर्देशांकाच्या बारा महिन्यांच्या सरासरीनुसार (1 जुलै 2015 ते 30 जून 2016) महागाई भत्ता 2.92 टक्के होतो. त्यामुळे कर्मचारी संघटना 3 टक्के महागाई भत्त्यासाठी आग्रही आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, 1 जुलैपासून होणार लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 9:03 PM