शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
2
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
5
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
6
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
7
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
8
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
9
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
10
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
11
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
12
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
13
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
15
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
16
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
17
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
18
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
19
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
20
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला

सरकार तपासणार ट्रकचालकांचे डोळे, आजपासून मोफत शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 2:34 AM

रस्ते अपघातांना तातडीने रोखण्यासाठी सरकार ट्रकचालकांच्या डोळ््यांची तपासणी करण्याची योजना बनवित आहे. यासाठी देशभर राष्ट्रीय महामार्गांवर मोफत तपासणी शिबिरे घेतली जातील.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : रस्ते अपघातांना तातडीने रोखण्यासाठी सरकार ट्रकचालकांच्या डोळ््यांची तपासणी करण्याची योजना बनवित आहे. यासाठी देशभर राष्ट्रीय महामार्गांवर मोफत तपासणी शिबिरे घेतली जातील. महात्मा गांधी जयंतीनिमित्त (२ आॅक्टोबर) रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे नागपूरमधील पंजारी टोलप्लाझावर शिबिराला प्रारंभ करतील.रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग तयार करणाºया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून २ ते ६ आॅक्टोबर दरम्यान ही विनामूल्य शिबिरे घेतली जातील. ट्रकचालकांसोबत क्लीनरच्या डोळ््यांचीही तपासणी केली जाईल, गरज भासल्यास त्यांना चष्माही मोफत दिला जाईल. याशिवाय नेत्रतज्ज्ञांकडून औषधे आणि इतर आवश्यक सल्ला दिला जाईल. ही शिबिरे वेगवेगळ््या राष्ट्रीय महामार्गांवर ५० ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावले जातील. ही शिबिरे अशासकीय संस्थांच्या मदतीने असतील व त्यांचे संचालन नेत्र विशेषज्ज्ञ व त्यांच्या सहकार्यांकडून केले जाईल. शिबिरांच्या ठिकाणी स्वच्छतागृह (शौचालय), हात धुण्याची सोय व पेय पदार्थांची व्हेंडिंग मशिन असेल. त्याच वेळी ५० ट्रक्सच्या पार्किंगची सोयही तेथे असेल.सरकार सदोष दृष्टी ही रस्ते अपघातांचे मोठे कारण समजते. चालकांच्या डोळ््यांची तपासणी व आवश्यक त्या उपाययोजनांमुळे अपघात कमी करता येऊ शकतील, असे सरकारला वाटते. गेल्या एक वर्षात देशात रस्ते अपघातांचे प्रमाण थोडेसे खाली आले आहे. तरीही वर्षभर दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू होतो. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी चार लाख ८० हजार ६५२ रस्ते अपघात झाले व त्यात एक लाख ५० हजार ७८५ लोक मरण पावले, तर चार लाख ९४ हजार ६२४ लोक जखमी झाले.महाराष्ट्रात भलेही जास्त संख्येने रस्ते अपघात होतात, तरी गेल्या एक वर्षात २४ हजार अपघात कमी झाले आहेत.२०१५ मध्ये ६३ हजार ८०५ अपघातझाले होते, तर २०१६ मध्ये ३९ हजार ८५७. अपघातांत मरण पावलेल्यांची संख्या व जखमींची संख्याही कमी झाली आहे, परंतु अपघातांच्या घटलेल्या संख्येच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. २०१५ मध्ये राज्यात १३ हजार २१२ लोक मरण पावले होते, तर२०१६ मध्ये १२ हजार ९३५.

टॅग्स :Accidentअपघात