शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
2
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
4
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
5
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
6
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
7
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
8
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
9
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
10
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
11
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
12
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
13
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
14
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
15
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
16
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
17
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
18
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
19
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
20
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

Crude Palm Oil: सुखवार्ता! खाद्यतेलाच्या किमती कमी होणार, सरकारनं पामतेलावरील आयात शुल्कात केली मोठी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 11:00 IST

खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी घट करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.

नवी दिल्ली-खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी घट करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. सरकारनं आयात शुल्क तब्बल ५.५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात देशातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारकडून गेल्या महिन्यात देखील खाद्य तेलावरील आयात शुल्कात घट करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात खाद्य तेलाच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

केंद्र सरकारनं ३० सप्टेंबरपर्यंत कच्च्या पाम तेलावरील (Crude Palm Oil- CPO)आयात शुल्क ३०. २५ टक्क्यांवरुन २४.७ टक्के इतकं केलं आहे. तर रिफाइंड पाम तेलावरील आयात शुल्क ४१.२५ टक्क्यांवरुन ३५.७५ टक्क्यांवर आणलं आहे. रिफाइंड सोया तेल आणि सनफ्लावर तेलावरील आयात शुल्क देखील ३० सप्टेंबरपर्यंत ४५ टक्क्यांवरून ३७.५ टक्के इतकं करण्यात आलं आहे. 

खाद्यतेलाची साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कारवाईखाद्य तेलाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तेलाची साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा सरकारनं दिला आहे. देशातील सर्व खाद्य तेल उत्पादक कंपन्या आणि होलसेल व्यापाऱ्यांकडून तेलाची साठेबाजी केली जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्रातील राज्य सरकारांना दिल्या आहेत. 

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पInflationमहागाईIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार