शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Pli Scheme : मोदी सरकारचा AC आणि LED बाबत मोठा निर्णय! सर्वसामान्यांना फायदा होणार, लाखो नव्या नोकऱ्या मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 2:35 PM

Government of India White Goods PLI Scheme : देशातील एअर कंडिशनर (AC) आणि एलईडी (LED) उत्पादनाबाबत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत सोलार पीवी मॉड्यूल आणि व्हाइट गुड्ससाठी पीएलआय स्कीमला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने देशातीली मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी PLI स्कीमला सुरुवात केली आहे. रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तुंना  व्हाइट गुड्स म्हणतात. यामध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडीशनर आणि इतर उपकरणांचा समावेश आहे. देशातील एअर कंडिशनर (AC) आणि एलईडी (LED) उत्पादनाबाबत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता देशातच या दोन्ही वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. Government of India Central Modi Cabinet approved Solar pv and white goods PLI Scheme

पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार,  "या निर्णयामुळे अनेक नव्या नोकऱ्या तयार होतील. त्याशिवाय वीजेच्या किमतीवरही नियंत्रण येईल. या निर्णयामुळे थेट स्वरुपात जवळपास 32 हजार लोकांना रोजगार मिळेल. अप्रत्यक्षरित्या जवळपास 1 लाख लोकांना नोकऱ्या मिळतील, अशी आशा आहे. केंद्र सरकारने व्हाईट गुड्सबाबत हा निर्णय घेतलाय. व्हाईट गुड्स म्हणजेच एअर कंडीशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रिक वस्तू होय. या वस्तूंच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने पीएलआय योजनेची घोषणा केली आहे."

"एक काळ होता जेव्हा भारतात एअर कंडीशनर तयार केले जात होते. मात्र, हळूहळू या क्षेत्रात परदेशी कंपन्यांनी आपला जम बसवला. आता देशात 70-80 टक्के एअर कंडीशनर परदेशातून आयात करावे लागतात ही परिस्थिती आहे. म्हणूनच सरकारने यासाठी पीएलआय योजनेची घोषणा केलीय. जसजशी देशातील समृद्धी वाढेल तसतशी देशातील या वस्तूंची मागणीही वाढेल. या वस्तूंचा सीएजीआर (Compound Annual Growth Rate) 15-20 टक्के आहे" अशी माहिती पीयूष गोयल यांनी दिली आहे. 

"देशात उत्पादन होईल तेव्हा आपोआप रोजगारही वाढतील"

पुढील 5 वर्षांमध्ये या वस्तूंचं देशात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 1.46 लाख कोटी रुपयांचा इंसेंटिव्ह देण्यात येईल. देशात वस्तूंचं उत्पादन झाल्याने भारताची आयात घटेल. याशिवाय देशात उत्पादन होईल तेव्हा आपोआप रोजगारही वाढतील. या योजनेंतर्गत परदेशी कंपन्यांना भारतात प्लँट उभा करण्यासोबतच भारतीय कंपन्यांना प्लँट उभा करण्यासाठी मदत केली जाईल. ही योजना पुढील 5 वर्षांसाठी असणार आहे अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतpiyush goyalपीयुष गोयलelectricityवीज