शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

काश्मिरी युवकाला जीपला बांधणा-या लष्करी अधिका-याचे मोदी सरकारने केले समर्थन

By admin | Published: April 17, 2017 8:41 AM

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जीपला एका युवकाला बांधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. 17 - जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जीपला एका युवकाला बांधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी काश्मिरी युवकाचा मानवी ढालीसारखा वापर करणा-या लष्करी अधिका-याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. 9 एप्रिलला ही घटना घडली. लष्कराने केलेल्या चौकशीची सरकारने दखल घेतली आहे. 
 
टाइम्स ऑफ  इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दगडफेक करणा-या जमावापासून संपूर्ण युनिटचा बचाव करण्यासाठी कमांडींग अधिका-याने हा निर्णय घेतल्याचे चौकशीतून समोर आले. इलेक्शन डयुटीवर असलेले जम्मू-काश्मीरमधील अधिकारी, कर्मचारी आणि जवानांना दगडफेक करणा-या जमावापासून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी या युवकाला जीपला बांधले. 
 
कमांडीग अधिका-याला नाखुषीने हा निर्णय घ्यावा लागला. त्याच्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. दगडफेक करणा-या जमावाने वेढल्याने हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे केंद्र सरकारने त्या अधिका-याच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. 
काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मिरी युवकाला जीपला बांधल्याचा व्हिडीओ आणि फोटो टि्वट करुन काश्मीरमधली दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला. 
 
दरम्यान लष्कराच्या गाडीला युवकाला बांधल्या प्रकरणी बीरवाह येथील पोलिस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. लष्कराच्या जीपला बांधलेल्या तरुणाचे नाव फारुख अहमद आहे. इंडियन एक्स्प्रेसने  या तरुणापर्यंत पोहोचत त्याला संपूर्ण वादावर प्रतिक्रिया विचारली. यावर त्याने मी आपल्या जीवनात कधीच दगडफेक केलेली नाही. मी दगडफेक करणा-यांपैकी नसून छोटी, मोठी कामं करुन आपलं पोट भरतो", असं त्याने सांगितलं आहे. फारुखच्या कुटुंबात तो आणि त्याची म्हातारी आई आहे.