शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सरकार-न्यायालय वादात न्यायदान व्यवस्था संकटात

By admin | Published: June 01, 2016 3:46 AM

मोदी सरकारच्या २ वर्षांच्या कारकिर्दीत देशाची न्यायव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक संकटात आहे. कोट्यवधी दावे व खटले कोर्टात प्रलंबित अवस्थेत आहेत.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीमोदी सरकारच्या २ वर्षांच्या कारकिर्दीत देशाची न्यायव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक संकटात आहे. कोट्यवधी दावे व खटले कोर्टात प्रलंबित अवस्थेत आहेत. सरकार व न्यायालयांच्या तांत्रिक वादामुळे हजारो न्यायाधिश व शेकडो न्यायमूर्तींच्या नेमणुका रखडल्या. त्यामुळे एकूण न्यायदान व्यवस्थेवरही विपरीत परिणाम जाणवतो आहे.उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या प्रक्रियेत बदल करण्यास मोदी सरकारने जुनी कॉलेजियम व्यवस्था बदलण्याचा धाडसी प्रयोग केला. नॅशनल ज्युडिशिअल अ‍ॅपाँर्इंटमेंट कमिशन (एनजेएसी) ही घटनात्मक अधिकार असलेली व्यवस्था निर्माण करण्याचा कायदा संसदेत २0१४ साली मंजूर केला. कॉलेजियम व्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसह चार ज्येष्ठ न्यायमूर्तींना हायकोर्ट व सुप्रिम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्त्या, व बदल्यांची शिफारस करण्याचे अधिकार होते. मोदी सरकारने न्यायमूर्तींच्या नेमणुका व बदल्यामंधे अधिक पारदर्शकता आणण्याचा दावा करीत व केंद्रीय विधी मंत्रालयाला त्यात आवश्यक हस्तक्षेप करण्याचे अधिकार मिळवण्याच्या हेतूने आॅगस्ट २0१४ मधे ६ सदस्यांच्या एनजेएसीकडे ते अधिकार सोपवण्याचा निर्णय घेतला. एनजेएसीच्या ६ सदस्यांमधे केंद्रीय कायदा मंत्री, सुप्रिम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींसह दोन ज्येष्ठ न्यायमूर्ती व देशातल्या २ नामवंत मान्यवरांचा समावेश होता. सुप्रिम कोर्टाने मात्र ही नवी व्यवस्था साफ अमान्य केली व एप्रिल २0१५ एनजेएसी कायदा रद्दबातल ठरवला. भारतात सध्या १0 लाख लोकांमागे १0 ते १२ न्यायाधिश असे प्रमाण आहे. ते १0७ पर्यंत वाढवावे अशी विधी आयोगाची शिफारस आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस)च्या धर्तीवर भारतीय न्यायालयीन सेवा (इंडियन ज्युडिशिअल सर्व्हिस) सुरू करण्याचा प्रस्ताव अजूनही विचाराधीनच आहे. ही सेवा सुरू झाली तर किमान कनिष्ट न्यायालयांना प्रतिवर्षी अधिक गुणवत्ता असलेले न्यायाधिश मिळू शकतील.केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने अलीकडेच प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार २0१५ सालच्या अखेरपर्यंत देशातल्या विविध न्यायालयात ३.५0 कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत. सुप्रिम कोर्टात ६६ हजार ७१३, विविध हायकोर्टात ४९ लाख ५७ हजार ८३३ आणि जिल्हा व तालुका स्तरांवरील कनिष्ट न्यायालयांमधे २ कोटी ७५ लाख ८४ हजार ६१७ प्रलंबित दावे व खटल्यांची २0१५ अखेरपर्यंतची संख्या आहे.