शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

Corona Vaccine : कार्यालयांनी केवळ कर्मचाऱ्यांनाच लस द्यावी, त्यांच्या कुटुंबीयांना नको; सरकारचे स्पष्ट निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 3:42 PM

Coronavirus Vaccine : Government limits workplace vaccination drives to staff only vaccine wont give it to family members कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करता येणार नाही, सरकारचे निर्देश. छोटी गावं आणि शहरांमध्ये याचे परिणाम जाणवण्याची व्यक्त करण्यात आली भीती.

ठळक मुद्देकंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करता येणार नाही, सरकारचे निर्देश.छोटी गावं आणि शहरांमध्ये याचे परिणाम जाणवण्याची व्यक्त करण्यात आली भीती.

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांचं आणि त्यांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता केंद्र सरकारनं पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. कामाच्या ठिकाणी केवळ कर्मचाऱ्यांचंच लसीकरण करता येणार असून त्यांच्या कुटुंबीयांना आता लस मिळणार नाही. कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करता येणार नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. Corona Vaccine : Government limits workplace vaccination drives to staff only vaccine wont give it to family membersकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं राज्य सरकारांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनंतर अनेक कंपन्या आणि उद्योग संस्था संभाव्य आढावा घेण्यासाठी सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करत आहेत. हे पत्र ४५ वर्षे वयाच्या पुढील कर्मचार्‍यांपुरतीच मर्यादित आहे असा संदर्भ असला तरी उद्योग मंडळं तसंच कॉर्पोरेट संस्थांनी या नियमांबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. याशिवाय या पत्रात काही मार्गदर्शक सूचनांमध्ये बदलांचाही उल्लेख आहे, जे यापूर्वी स्पष्टपणे संकेतस्थळावर उपलब्ध नव्हते. यामुळेच काही कंपन्यांची सरकारकडे यासंदर्भात स्पष्टता आणण्याची मागणी केली आहे. 

छोट्या गावांमध्ये अधिक परिणाम जाणवेल“जर हे लागू करण्यात आलं असतं तर लोकांना अन्य सेंटर्समध्ये अपॉईंटमेंट मिळाली असतं. परंतु आता १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मर्यांदेमध्ये हे अशक्य आहे,” असं एका कंपनीच्या अधिकाऱ्यानं नमूद केलं. “बुधवारी झालेल्या चर्चेचा रुग्णालयांच्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या संबंधांवर परिणाम होणार नाही. परंतु लसीकरणाचे जे उपक्रम कार्यालयांमध्ये राबवण्यात येत आहेत त्यावर याचा परिणाम होईल,” असं सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. छोटी गावं आणि शहरांमध्ये याचा परिणाम अधिक जाणवेल अशी शक्यता आहे. ज्या ठिकाणी रुग्णालयांची साखळी नाही अशा ठिकाणी काही कंपन्या लसीकरणाचे उपक्रम राबवत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कर्मचारी मोहिमेतून बाहेर पडण्याची भीतीसरकारनं लसीकरणाच्या बाबतीत उचलेलं हे पाऊल खऱ्या अर्थानं भ्रम निर्माण करणारं आहे. आरोग्य मंत्रालयानं आम्हाला मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्याचं कोणतंही कारण सांगितलं नाही, असं एका प्रमुख उद्योग संस्थेच्या पदाधिकाऱ्यानं नमूद केलं. आरोग्य मंत्रालयानं कोणतंही कारण दिलं नसल्यानं यामागे लसींची कमतरता असल्याचं काही उद्योगांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तसंच आपल्या कुटुंबीयांचं लसीकरण करण्यात येत नसल्यानं या लसीकरण मोहिमेतून कर्मचारीही बाहेर पडू शकतील अशी भीती कंपन्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतhospitalहॉस्पिटल