बंगळुरू- सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेशी जागा किंवा वेळेवर अॅम्ब्युसन्स उपलब्ध नसल्याच्या घटना घडल्याचं आपण याआधी पाहिलं आहे. सरकारी हॉस्पिटलने वेळेवर अॅम्ब्युलन्स तसंच उपचार दिले नसल्यांने सर्वसामान्यांना त्याचा त्रास झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. असाच एक प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे. कर्नाटकातील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलेला एक तास प्रसुती वेदनेत रहावं लागलं. मंड्यामध्ये असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्याने आणण्यात आलं होतं. पण त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच उपलब्ध नसल्याने तिला तब्बल एक तास हॉस्पिटलच्या आवारात प्रसुती कळा देत विव्हळत रहावं लागलं, असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
एक तासानंतर अॅम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आणि त्या महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्या हॉस्पिटलमध्ये महिलेने बाळाला जन्म दिला. आता आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं, नातेवाईकांनी सांगितलं आहे.
पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याने केला 10किमी प्रवास
खिशात पैसे नसल्याने आणि रुग्णालयानेही गाडी देण्यास नकार दिल्याने एका आदिवासी व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन जावा लागला. आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन तो तब्बल 10 किमी चालत होता. ओडिसामधील भवानीपाटनामध्ये ही घटना घडली होती.
दाना माझी यांच्या पत्नी अमंग यांना टीबीचा आजार होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी रुग्णालयाकडे मृतदेह घेऊन जाण्यासाठी गाडी देण्याची विनंती केली. पण काहीच मदत मिळत नसल्याचं पाहून त्यांनी चादरीमध्येच पत्नीचा मृतदेह गुंडाळून घेतला आणि आपल्या घरचा प्रवास सुरु केला.त्यांची 12 वर्षाची मुलगीही सोबत चालत होती. रुग्णालयापासून तब्बल 60 किमी अंतरावर असलेल्या कालाहंडी गावात त्यांचं घर होतं.
'मी सर्वांकडे मदत मागितली पण कोणीच मला भीक घातली नाही. मी गरीब आहे, गाडीचा खर्च नाही उचलू शकत असं रुग्णालय प्रशासनाला वारंवार सांगितलं. पण आपण काहीच मदत करु शकत नाही सांगत त्यांनी हात वर केल्याचं',