नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्त्वाची परवानगी देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने लाेकसभेत स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १ काेटी २५ लाख म्हणजेच सुमारे १ टक्का भारतीय नागरिक परदेशात राहात आहेत. तसेच गेल्या ५ वर्षांमध्ये ६ लाख ७३ हजार जणांनी भारतीय नारिकत्त्वाचा त्याग केल्याची माहितीही गृहमंत्रालयाने लाेकसभेत सादर केली. भारताच्या घटनेनुसार दुहेरी नागरिकत्त्वाला परवानगी देण्यात आलेली नाही. अनिवासी भारतीयांना भारत सरकारतर्फे ‘ओव्हरसीज सिटीझनशिप ऑफ इंडिया’ प्रदान करण्यात येते. पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता इतर देशांतील नागरिकत्व घेतलेल्या भारतीय वंशाच्या काही ठराविक नागरिकांना अशा प्रकारचे परदेशी भारतीय नागरिकत्व देण्यात येते.
दुहेरी नागरिकत्वाचा विचार नाही: गृह मंत्रालय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 6:33 AM