नवी दिल्ली - तब्बल 59 चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानतंर सरकार आता आणखी 20 अॅपच्या डेटा शेअरिंग पॉलिसीची समीक्षा करत आहे. सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत, त्या कंपन्यांवर बंदी घातली जाऊ शकते. एवढेच नाही, तर आयटी मंत्रालय काही वेबसाइट्सवरही बंदी घालू शकते. सरकार ज्या 20 अॅपवर डाटा शेअरिंग पॉलिसीची समीक्षा करत आहे, त्यात अनेक गेमिंग अॅप्सचादेखील समावेश आहे.
भारतात 59 चिनी अॅप्स बॅन -नुकतेच केंद्र सरकारने इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट, 2000 (IT Act, 2020)च्या सेक्शन 69A नुसार 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यातील सीमेवर भारत-चीन तणाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर भारत सरकारने हे पाऊल उचलले.
लष्करातील अधिकाऱ्यांनाही 89 अॅप्स डेलीट करण्याचा आदेश -याशिवाय सरकारने भारतीय सैन्य दलांतील अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना फेसबूक-इंस्टाग्राम अकाउंट्स डेलीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय इतर 89 अॅप्सची यादीही जारी करण्यात आली आहे. जे अॅप्स मोबाईलमधून अनइंस्टॉल करण्यास सांगण्यात आले आहे. आदेशानुसार, हे अॅप्स सर्वांना 15 जुलैपर्यंत डेलीट करायचे आहेत. यामध्ये वुईचॅट, हाईकसारखी मेसेंजर अॅप्स, पब्जीसारखे गेमिंग अॅप्स, डेटिंग अॅपमध्ये टिंडर, ओकेक्युपीड आदी अॅप्स, तसेच डेली हंट या न्यूज अॅपचाही समावेश आहे.
अमेरिकेचंही भारताच्या पावलावर पाऊल?आम्ही चिनी अॅपवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्येही चिनी अॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे लवकरच चीनला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. एकट्या भारतातल्या बंदीमुळे टिकटॉकला जवळपास ६ अब्ज डॉलर्सचे नुकसान होत आहे. यामध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा
कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी
ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर