सरकार अर्थव्यवस्था बरबाद करीत आहे -राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 04:22 AM2020-06-07T04:22:15+5:302020-06-07T04:22:53+5:30
विशेष म्हणजे देशात बेरोजगारांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : मोदी सरकारकडून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न फेटाळून लावत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर शनिवारी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राहुल गांंधी म्हणाले की, मोदी सरकार देशाची अर्थव्यवस्था बरबाद करत आहे. देशातील गरीब आणि अन्य लोकांच्या हातात ते थेट पैसे देऊ इच्छित नाहीत.
विशेष म्हणजे देशात बेरोजगारांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे. जग एकीकडे सायकल दिवस साजरा करत असताना सर्वात जुन्या अॅटलस कंपनीने गाझियाबादचा कारखाना बंद केला. त्यामुळे एक हजारपेक्षा अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टष्ट्वीट केले की, लोकांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी सरकारने आपली नीती आणि योजना स्पष्ट कराव्यात. त्यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दाही मांडला. पलायन केलेले लोक गावी आले तर तेथेही काम नाही. नोएडात ३० वर्षांचा दिनेश हा एमबीए झालेला तरुण मनरेगात मजुरीचे काम करत आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये परिस्थिती यापेक्षा गंभीर आहे.