नवी दिल्लीः मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर एटीएममध्ये जसा खडखडाट झाला होता, तसंच चित्र देशाच्या अनेक भागांत दिसू लागल्यानं आश्चर्य आणि चिंता व्यक्त होतेय. एटीएममधल्या नोटा गेल्या कुठे?, असा प्रश्न विचारला जातोय. परंतु, या चलनचणचणीमागे कुठलाही गडबड-घोटाळा नसल्याचा खुलासा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या रोख रकमेचा तुटवडा जाणवतो आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. 'देशातील काही भागांमध्ये रोख रकमेची मागणी जास्त असल्यानं इतर भागांमध्ये चणचण जाणवी लागली आहे. देशातील बाजारात सध्या गरजेपेक्षा जास्त रक्कम उपलब्ध आहे,' असं जेटलींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
अचानक कुठे गेल्या ATM मधल्या नोटा?; अर्थमंत्री जेटलींनी सांगितलं कशा फुटल्या वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 1:10 PM