इंदोर : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईसंदर्भात राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी एक विधान केले.
ज्या प्रकारे अमेरिकेने ओसामा बिन लादेनवर केलेल्या कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. दिग्विजय सिंह म्हणाले, 'भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईवर मी प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र, या भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटो मिळणे शक्य आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने ओसामा कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले. तसेच, सरकारनेही आपल्या भारतीय हवाई दलाने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत करायला हवे.'
दरम्यान, 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.