शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

सावधान! जर तुम्हालाही KYC साठी कॉल किंवा SMS आला तर सतर्क व्हा; सरकारकडून अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 1:23 PM

government warns of kyc fraud to fake calls and messages : केवायसी नसल्यामुळे आपले बँक खाते बंद होईल असे सांगत कोणताही एसएमएस आला तर अशा परिस्थितीत, सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा आणि त्याबद्दल जाणून घ्या.

नवी दिल्ली :  देशात कोरोना संकट काळात बँकिंग फसवणूकीची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. यामागील एक मुख्य कारण म्हणजे, या काळात इंटरनेटचा वाढता वापर. एकीकडे सर्व काही ऑनलाईन होत आहे, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेत आहेत. याबाबत गृहमंत्रालयाने माहिती दिली आहे. सायबर दोस्त नावाच्या सरकारच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून लोकांना या नव्या पद्धतीने सतर्क करण्यात आले आहे.

दरम्यान, गृह मंत्रालय याविषयी सतत सतर्क राहते. हे सायबर गुन्हेगार केवायसीची बतावणी करून लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवित आहेत, असे ट्विट करुन गृह मंत्रालयाने म्हटले आहे. ग्राहक केवायसी / रिमोट अॅक्सेस अ‍ॅप फसवणूकीपासून सावध रहा. सध्या फसवणूक करणारे लोक कॉल किंवा एसएमएस करुन लोकांना केवायसी करण्याच्या नावाखाली फसवत आहेत.

अशाप्रकारे, लोकांकडून त्यांचे वैयक्तिक तपशील मिळवून ते गुन्हेगारी कारवाया करीत आहेत. मंत्रालयाने लोकांना अशी कोणतीही चूक न करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, तुमच्याकडे येणाऱ्या कोणत्याही कॉल, मेसेज किंवा ई-मेलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असेही म्हटले आहे.

केवायसीसाठी कॉल किंवा एसएमएस आल्यास सतर्क व्हा!जर आपल्याला केवायसीसाठी कोणताही कॉल किंवा एसएमएस मिळाल्यास तत्काळ सावधगिरी बाळगा. केवायसी नसल्यामुळे आपले बँक खाते बंद होईल असे सांगत कोणताही एसएमएस आला तर अशा परिस्थितीत, सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा आणि त्याबद्दल जाणून घ्या. याशिवाय, फोनवर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नका.

या व्यतिरिक्त आपल्या फोनवर Anydesk किंवा TeamViewer सारखे कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करणे टाळा. आपण अशा अ‍ॅपसह आपल्या डिव्हाइसवर रिमोट अॅक्सेस देत असल्यास, फसवणूक करणार्‍यांना आपला पिन, ओटीपी, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही आर्थिक फसवणूकीचा बळी ठरू शकता.

बनावट मेसेज कसे टाळावे?बनावट मेसेजबाबत सतर्कता सरकार वेळोवेळी जारी केली जाते. यासह, तुम्ही अज्ञात नंबरवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि अशा मेसेजना फॉरवर्ड करणे टाळावे. जेणेकरून दुसरा कोणताही युजर्स फसवणूकीचा बळी पडू नये.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMobileमोबाइल