नवी दिल्ली: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांना मोठी बातमी मिळाली. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे थोड्याच दिवसांत देशात ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोविशील्ड लसीचा वापर सुरू होईल. तशी परवानगी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीनं घेतला आहे. एकीकडे कोरोना लसीकरणाची तयारी जोरात सुरू असताना दुसरीकडे या कार्यक्रमाबद्दलची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकार प्राथमिक टप्प्यातल्या ३० कोटी व्यक्तींच्या लसीकरणाची आर्थिक जबाबदारी घेणार असल्याचं नीती आयोगाचे सदस्य आणि राष्ट्रीय कोविड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. विनोद पॉल यांनी सांगितलं. सीएनबीसी-टीव्ही१८ शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.मोठी बातमी! भारताकडून सीरमच्या कोविशील्ड लसीच्या वापरास मंजुरीसध्याच्या घडीला देशातील ९६ हजार जणांना कोरोना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 'पुढील ६ ते ८ महिन्यांत कोरोना योद्ध्यांसह ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येईल. वैद्यकीय कर्मचारी आणि ज्येष्ठांना लसीकरण मोहिमेत प्राधान्य दिलं जाईल. देशभरातील २९ हजार केंद्रांवर कोरोना लस टोचण्यात येईल. या केंद्रांवर कोरोनाची लस पोहोचवण्याची तयारी पूर्ण झाली आहे,' अशी माहिती पॉल यांनी दिली.कोरोना लसीकरण मोहीम निवडणुकांच्या तयारीप्रमाणे, आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार : डॉ. हर्षवर्धन'कोरोना लसीकरणासाठी संपूर्ण देशात तयारी करण्यात आली आहे. उद्योग, सरकार या अभियानात एकत्रितपणे काम करत आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. यानंतर कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या इतर समूहांना लस दिली जाईल. त्यासाठीची तयारीदेखील अंतिम टप्प्यात आहे,' असं पॉल यांनी सांगितलं.लाल मुंग्यांची चटणी कोरोनावरील उपचारात प्रभावी? हायकोर्टाने आयुष मंत्रालयाला दिले चौकशीचे आदेशपहिल्या टप्प्यात ३० कोटी जणांना लसडॉ. पॉल यांनी लसीकरणाबद्दलच्या सरकारच्या कार्यक्रमावर प्रकाश टाकला. 'लसीकरण अभियानात ३० कोटी जणांना प्राधान्य असेल. सुरुवातीला पूर्ण लोकसंख्येचं लसीकरण आमचं लक्ष नसेल. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वाधिक धोका असलेल्यांना लस दिली जाईल,' असं पॉल म्हणाले.
Corona Vaccination: १३० कोटी नव्हे; मोदी सरकार 'इतक्या'च लोकांच्या कोरोना लसीचा खर्च उचलणार
By कुणाल गवाणकर | Published: January 01, 2021 8:50 PM