शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

४०० रुपयांचा एलईडी बल्ब सरकार देणार १० रुपयांत!

By admin | Published: October 09, 2014 3:09 AM

बाजारात ४०० रुपयांना मिळणारा, विजेची मोठी बटत करणारा, एलईडी बल्ब अवघ्या १० रुपयांत सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करण्याचे एक अभिनव ‘

नवी दिल्ली : बाजारात ४०० रुपयांना मिळणारा, विजेची मोठी बटत करणारा, एलईडी बल्ब अवघ्या १० रुपयांत सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करण्याचे एक अभिनव ‘बिझिनेस मॉडेल’ केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने तरार केले आहे. एलईडी प्रकाशस्रोताचा शोध लावणाऱ्या तीन जपानी वैज्ञानिकांना यंदाचा पदार्थविज्ञानातील नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी या नव्या उपक्रमाची प्रत्यक्षात सुरुवातही करण्यात आली आहे.एका अधिकृत पत्रकात ही माहिती देताना असे म्हटले आहे की, ‘ब्युरो आॅफ एनर्जी एफिशियन्सी’ आणि सार्वजनिक क्षेत्रातील चार केंद्रीय वीज कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लि.’ (ईईएसएल)ने वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने हे नवे ‘बिझिनेस मॉडेल’ विकसित केले आहे. त्यानुसार १ईईएसएल’ खासगी उत्पादकांकडून एलईडी दिव्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्यांची नागरिकांना प्रति बल्ब १० रुपये या दराने विक्री करणार आहे.एलईडी दिव्यांच्या वापरातून विजेची बचत होऊन जो खर्च वाचेल त्यातून वीज वितरण कंपन्यांनी त्यापुढील पाच ते आठ वर्षांत ‘ईईएसेल’ला त्यांनी पुरविलेल्या एलईडी दिव्यांची रक्कम अदा करायची, असेही या ‘बिझिनेस मॉडेल’मध्ये अंतर्भूत असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.या ‘मॉडेल’नुसार एलईडी दिवे पुरविण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये देशातील विद्युत दिवे बनविणाऱ्या बहुतेक सर्वच कंपन्या सहभागी झाल्या व त्यांनी विविदेत दिलेली एलईडी दिव्याची कमीत कमी किंमत २०४ रुपये होती, असेही हे पत्रक म्हणते. भारतीय बाजारात २०१० मध्ये एलईडी दिवे सर्वप्रथम आले तेव्हा त्यांची किंमत प्रत्येकी १,२०० रुपये होती.राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या घरांमध्ये वीज पुरवठा करताना फक्त एलईडी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे केंद्रीय ऊर्जा विभागाने याआधीच ठरविले आहे. रस्त्यांवरील सध्याचे पारंपारिक दिवे काढून त्याऐवजी एलईजी दिवे बसविण्याची अनेक कामे ‘ईईएसएल’ने देशाच्या अनेक भागांत पूर्ण केली आहेत. अशाच प्रकारे पुद्दुचेरीमधील ७.५ लाख घरांमध्येही एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.विजेच्या दिव्यांचे उत्पादन करणाऱ्या देशातील सर्व कंपन्यांनी एलईडी दिव्यांचे कारखाने स्थापन केले असून अभियंत्यांना प्रशिक्षण देणे व विविध इमारतींमध्ये जाऊन या दिव्यांची प्रात्यक्षिके दाखविणेही सुरु केले आहे. एलईडी दिव्यांची घरगुती वापरासाठीची मागणी वाढेल तसतशी त्यांचे उत्पादन वाढेल आणि किंमतही कमी होईल, असेही ‘ईईएसएल’ने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)