'मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 11:09 AM2020-05-08T11:09:53+5:302020-05-08T11:36:44+5:30
औरंगाबाद येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली अ
इंदौर - औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. जालना येथील स्टील कंपनीचे १९ कामगार भुसावळला जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार, तर २ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.
औरंगाबाद येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून, रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. आवश्यक ती मदत केली जाईल, असंही आश्वासन मोदींनी दिलं आहे. आता, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, कृपया मजूर भावांनी पायी, चालत गावाकडे येण्याचा प्रयत्न करु नये. सरकार विशेष रेल्वेच्या माध्यमातून तुम्हाला राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी, संबधित राज्य सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचंही चौहान यांनी म्हटलं आहे.
मी आपल्यासोबत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मी आपल्या सर्वांना स्वगृही परत आणेन. पण, कुणीही पायी प्रवास करु नका. आम्ही आपल्याशी लवकरच संपर्क साधणार आहोत. सोशल मीडिया आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून आपणास माहिती देण्यात येईल, असेही चौहान यांनी म्हटले. तसेच, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत, तर जखमींचा पूर्ण खर्च सरकार करणार असल्याचेही चौहान यांनी सांगितले. या घटनेचा संपूर्ण तपास करण्यात येईल, तर घटनास्थळावर विशेष विमानाने मंत्री मीना सिंह यांच्यासमवेत राज्य कंट्रोल रुमचे अप्पर सचिव आयसीपी केशरी पोहोचणार आहेत. उड्डाणमंत्र्यांसमवेत चर्चा करुन विशेष विमानाची परवानगी घेण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
उसके अलावा प्रदेश सरकार की तरफ़ से हर एक मृतक श्रमिक के परिजनों को पाँच लाख दिए जाएँगे, और घायलों के इलाज की पूरी व्यवस्था की जाएगी।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) May 8, 2020
मैं विशेष विमान से उच्च अधिकारियों की एक टीम भेज रहा हूँ, जो वहाँ पर मृतकों के अंतिम संस्कार की व्यवस्था करेगी और घायलों को हर सम्भव मदद करेगी।
जालना येथील एसआरजे कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.
दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीसुद्धा ट्विट केलं आहे. आज पहाटे ५.२२ वाजता नांदेड डिव्हिजनच्या बदनापूर व करमाड स्टेशनजवळ काही कामगारांचा मालगाडीच्या खाली येऊन अपघात झाल्याची दुःखद बातमी समजली आहे. बचावकार्य सुरू असून, रेल्वे अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले आहेत. मृतांच्या आत्म्यांना ईश्वर शांती देवो, यासाठी प्रार्थना करतो, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत.