नवी दिल्ली : अंगणवाडी कार्यकर्तींचे मानधन वाढवण्यासंदर्भात आश्वासन देण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने शुक्रवारी मौन बाळगले. मात्र, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या या महिला कार्यकर्त्यांचे मानधन वाढवण्यास राज्य सरकारे मुक्त आहेत, असेही स्पष्ट केले.महिला व बालविकासमंत्री कृष्णा राज यांनी लोकसभेत सांगितले की, अंगणवाडी कार्यकर्त्यांना मासिक मानधन दिले जाते व त्यात वेळोवेळी सरकारने ५ टक्के वाढ केलेली आहे. अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकांना २०११ पासून अनुक्रमे ३,००० व १,५०० रुपये मासिक मानधन दिले जाते. यातील ६० टक्के निधी केंद्राचा व उर्वरित राज्याचा असतो. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल तसेच तृणमूलच्या अर्पिता घोष यांनीही अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मानधन वाढवण्याची मागणी केली. वित्तमंत्र्यांनी थोडी दया दाखवावी, असे खरगे म्हणाले.
अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनवाढीवर सरकारचे मौन
By admin | Published: April 08, 2017 12:23 AM